शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

भांडुपमधील पालिकेच्या उद्यानाची दुरवस्था

By admin | Updated: August 22, 2016 02:15 IST

मुलांसाठी उभारलेल्या भांडुप येथील महापालिका उद्यानाची दुरवस्था झाली आहे.

मुंबई : मुलांसाठी उभारलेल्या भांडुप येथील महापालिका उद्यानाची दुरवस्था झाली आहे. येथील झोपाळे, घसरगुंडी व अन्य मनोरंजनाचे साहित्य तुटले आहे. महापालिकेकडे याबाबत तक्रार करूनही प्रशासनाने काहीच कार्यवाही केलेली नाही. शिवाय स्थानिक लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, नागरिक संताप व्यक्त करीत असून, उद्यानाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करीत आहेत.भांडुप पश्चिम येथील सरदार प्रतापसिंह संकुलाजवळ महापालिकेचे उद्यान आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी मनोरंजनाचे साहित्य बसविण्यात आले आहे. मात्र या उद्यानातील घसरगुंडी, झोपाळे यांची दुरवस्था झाली होती. स्थानिकांनी उद्यानाच्या दुरुस्तीसाठी तगादा लावल्यानंतर येथील उद्यानाची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, या उद्यानाची देखभाल होत नसल्यामुळे मनोरंजनाच्या साहित्याचे पुन्हा नुकसान होत आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. ठिकठिकाणी साहित्य तुटल्यामुळे लहान मुलांना उद्यानात खेळता येत नाही. येथे सुरक्षारक्षक नसल्याने साहित्याचा गैरवापर होतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी रिकाम्या जागेचा गैरफायदा घेत, गर्दुल्ले मैदानात वावरत असतात. स्थानिकांच्या तक्रारीनंतर गर्दुल्ल्यांवर कारवाई करण्यात येते. मात्र, काही दिवसांनी परिस्थिती पूर्वीसारखीच होते. यावर स्थानिकांनी संताप व्यक्त करत, खेळासाठी मुलांना जागा उपलब्ध करून देण्यासोबतच महापालिकेने उद्यानांची काळजी घ्यावी, शिवाय लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)>महापालिका उद्यानासाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे या ठिकाणी रात्री गर्दुल्ल्यांचा सुळसुळाट असतो. येथील लहान मुलांच्या खेळण्यांची गेल्या काही दिवसांपासून दुरवस्था झाली आहे. अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचा एकही माणूस येथे फिरकत नाही.- मनोहर शिंदे, रहिवासी