शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आक्षेपार्ह विधानामुळे विधान परिषद तहकूब

By admin | Updated: March 30, 2017 03:22 IST

विधान परिषदेबद्दल विधानसभेतील एका सदस्याने केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरुन विरोधकांनी आक्रमक

मुंबई : विधान परिषदेबद्दल विधानसभेतील एका सदस्याने केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरुन विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याने बुधवारी विधान परिषदेत तब्बल दीड तास कामकाज तहकूब झाले. त्याचवेळी शेतक-यांच्या कर्जमाफीच्या विषयावर दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब झाले.विधानसभेतील एका सदस्याने विधान परिषदेबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तसेच इतर काही सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करण्याची तयारी दाखवली. सदस्यांच्या जोरदार मागणीनंतर सभागृहाचे कामकाज याकरीता दीड तासांसाठी तहकूब झाले. सभागृह पुन्हा चालू झाल्यानंतर सभापतींनी यावर विधानसभेच्या अध्यक्षांबरोबर चर्चा झाल्याचे सांगितले. विधानसभेतल्या त्या सदस्याचे भाष्य कामकाजातून काढून टाकण्यात आल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या विषयावर येथे झालेली सारी चर्चा आपण कामकाजातून काढून टाकत आहे, असे सभापतींनी जाहीर केले.कर्जमाफीच्या मुद्द्यावरही कामकाज तहकूबविशेष बैठकीने सभागृहाच्या कामकाजाला आज सुरूवात झाली. कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी बोलण्यास सुरूवात केली. सभागृहाचे कामकाज व्यवस्थित व्हावे म्हणून विरोधी सदस्यांनी कामकाजात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी याला हरकत घेत सरकार विरोधी पक्षांवर खापर फोडत असल्याचा आरोप केला. विरोधी पक्षांकडून शेतक-यांच्या प्रश्नांवर, खास करून कर्जमाफीच्या मुद्द्यावर चंद्रपूरमधून काढण्यात येत असलेल्या संघर्षयात्रेचा विषयही त्यांनी मांडला.कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक ठाम आहेत. अधिवेशन सुरू झाल्यापासून आज तीन आठवडे आम्ही याचा आग्रह धरत आहोत. सरकारने याची दखल घ्यावी व आजच्या आज कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंचे समर्थकही आक्रमक झाले. त्यामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.सभागृह चर्चेसाठी आहे - मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाच्या सूचनेच्या माध्यमातून शेतक-यांच्या कर्जमाफीचा विषय उपस्थित केला. कर्जमाफीची मागणी करणा-या विधानसभेतल्या सदस्यांना निलंबित करण्यात आल्याचा उल्लेख करताना त्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी वारक-यांचा टाळ वाजवला, ही चूक आहे का, असा सवाल केला. त्यावर सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांच्या हितासाठी सरकार योजना तयार करत असल्याचे सांगितले. विधानसभेतल्या सदस्यांचे निलंबन कर्जमाफीसाठी मागणी केली म्हणून झाले नाही तर त्यांच्या वर्तनामुळे झाले, असे त्यांनी ठासून सांगितले. सभागृह चर्चेसाठी आहे. टाळ वाजवण्यासाठी नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना खडसावले.