चिपळूण : गोवळकोट कदम बौद्धवाडी येथील घरांच्या स्थलांतराबाबत अजून निर्णय झाला नसल्याने १५ कुटुंबे अजूनही धोक्याच्या छायेत आहेत. गोविंदगड किल्ला परिसरात जमिनीला पडलेल्या भेगा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. १५ दिवसांपूर्वी पुनर्वसनासाठी तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी येथील एक शासकीय जागा निश्चित केली होती. मात्र पुढे काही कार्यवाही झाली नाही.पुनर्वसनाचा प्रश्न जलदगतीने सुटावा, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, खासदार रामदास आठवले यांच्याकडेही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. परंतु स्थलांतराची नोटीस पाठविण्यापलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. (वार्ताहर)माळीण होण्याची भीती..चिपळूण तालुक्यातील गोवळकोट कदम बौद्धवाडीला दरडी कोसळण्याचा धोका आहे. मात्र पुनर्वसनाबाबत प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. हा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला नाही, तर माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.
स्थलांतर रखडल्याने १५ कुटुंबांना धोका
By admin | Updated: July 14, 2015 00:20 IST