शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नसल्याने ‘जलपरी’ला लागला ब्रेक

By admin | Updated: May 22, 2016 03:47 IST

कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे

मिरज (सांगली) : कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे. मालगावसह अन्य गावांतील नळपाणी पुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, रविवारपर्यंत नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटकात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकात पाणी पोहोचण्यासाठी कृष्णा नदीपात्रात ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गेला आठवडाभर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. म्हैसाळ योजनेचे पंप सुरू ठेवण्यासाठी आठ फूट पाणीसाठा आवश्यक असताना पाणीपातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत.म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या १५ पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. म्हैसाळचे पंप बंद पडल्याने कालव्यातून जतपर्यंत जाणारे पाणी थांबले आहे.मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल उघडा पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. रेल्वेचा पाणीपुरवठा सुरू राहावा, यासाठी नदीपात्रात पोकलॅनद्वारे जॅकवेलजवळील गाळ काढून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नदीतून पाणी उपसा थांबल्याने शनिवारी लातूरला पाठविण्यासाठी पाणी टँकर भरले नाहीत. (प्रतिनिधी) वारणाचे पाणी आल्यानंतरच टँकर शुक्रवारी रात्री रेल्वे टँकर भरले नसल्याने शनिवारी सकाळी टँकर भरण्यासाठी कशीबशी पाण्याची व्यवस्था करून ५० रेल्वे टँकर लातूरला रवाना करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीपुरवठा थांबविण्यात आला. वारणा धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतरच लातूरसाठी टँकर भरण्याचे काम सुरू होणार आहे. ११ एप्रिलपासून सुमारे ८ कोटी २० लाख लीटर पाणी मिरजेतून लातूरला पाठविण्यात आले आहे. समन्वयाचा अभाव - देशपांडेपाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणखी १५ दिवस लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा राहावा, यासाठी प्रशासन व पाटबंधारे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाचे नेते मकरंद देशपांडे यांनी केला.