शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस कर्मचा-याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2016 22:30 IST

मालेगाव-वाशिम महामार्गावर अपघातात पोलीस कर्मचा-याचा मृत्यू, दूसरा जखमी.

वाशिम: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील पोलीस कर्मचारी ठार झाल्याची घटना मालेगाव-वाशिम महामार्गावर गुरुवारी दुपारी १२.३0 वाजताच्या सुमारास घडली. विपुल शेळके असे मृतकाचे नाव आहे.वाशिम येथे स्थानिक गुन्हे शाखेमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई विपुल शेळके व त्यांचा मित्र धनंजय नितीन इंगोले (रा. काटा, ता.जि. वाशिम) हे कामानिमित्त मालेगाव येथे एमएच ३७ एम ७५७२ क्रमांकाच्या मोटारसायकलने जात होते. दरम्यान, झोडगा फाट्याजवळ असलेल्या नीलकमल धाब्यानजीक समोरून येणार्‍या भरधाव ट्रकने (एमएच २८ बी ७१५३) मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यामध्ये शेळके यांना गंभीर दुखापत झाली, तर इंगोले किरकोळ जखमी झाले. या दोघांनाही वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले; मात्र वाटेतच शेळके यांची प्राणज्योत मालवली. धनंजय इंगोले यांच्यावर अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.