शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ध क्का दा य क... शाळेत डेंग्यू डासांच्या अळ्या

By admin | Updated: September 3, 2014 01:36 IST

शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील

महापालिकेच्या चमूने केली पाहणी : कुठे फवारणी तर कुठे सफाईनागपूर : शहरातील दोन नामांकित शाळांमध्ये मंगळवारी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या (चामडोक) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाच्या चमूला काटोल रोड येथील सीडीएस शाळेतील बंद असलेल्या कारंजामध्ये तर दाभा रोडवरील सांदीपनी शाळेत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात चामडोक मिळाल्या. विभागाच्या चमूने तत्काळ कारवाई करीत त्या नष्ट केल्या आणि खबरदारी म्हणून फवारणीही केली. ‘लोकमत’ च्या वृत्तामुळे आणि महापालिकेच्या तत्परतेमुळे या दोन शाळेत डेंग्यूच्या डासांवर प्रतिबंध घालण्यास यश मिळाले.डेंग्यूच्या तापाने उपराजधानी फणफणली आहे. याला सर्वात जास्त विद्यार्थी बळी पडत आहे. शासकीय रुग्णालयांसोबतच खासगी इस्पितळात या आजाराचे मोठ्या संख्येत रुग्ण दिसून येत आहे. डेंग्यूचे डास दिवसा चावत असल्याने आणि याचवेळी विद्यार्थी शाळेत राहात असल्याने ‘लोकमत’ने सोमवारी दहा शाळांचे सर्वेक्षण केले. ‘डेंग्यूचे विघ्न’ या मथळ्याखाली शाळांमध्ये डासांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना होतच नसल्याचे धक्कादायक वास्तव मांडले. या वृत्ताची दखल महापालिकेने घेतली. ‘लोकमत’च्या चमूने सर्वेक्षण केलेल्या काही शाळांमध्ये मनपाच्या चमूने पोहचून पाहणी केली.हनुमानगर झोननेही घेतली दखलमनपाच्या हनुमाननगर झोन क्रमांक ३ च्या आरोग्य विभागानेही या वृत्ताची दखल घेतली. झोनल अधिकारी डी.एम. कलोडे यांनी स्वत:हून दुर्गानगर येथील महापालिकेच्या शाळेची पाहणी केली. येथील स्वच्छता गृह, पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून कीटकनाशकाची फवारणी करून घेतली. सोबतच राजाबाक्षा येथील पं. बच्छराज व्यास विद्यालयाच्या परिसराची पाहणी केली. विद्यालयाच्या सायकल स्टॅण्डच्या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याचा ढीगही उचलण्याचे निर्देश दिले. दुपारनंतर हा संपूर्ण परिसर चकाचक झाला होता. सीडीएस व सांदीपनी शाळेत डेंग्यूचे डाससीडीएस व सांदीपनी शाळेत डेंग्यूचे डास असल्याचे मनपाच्या मलेरिया व फायलेरिया विभागाच्या अधिकारी डॉ. जयश्री ठोटे यांनी सांगितले, मंगळवारी केलेल्या पाहणीत ‘सीडीएस’ आणि ‘सांदीपनी’ या शाळांमध्ये डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्याने धक्काच बसला. सीडीएस शाळेत बंद असलेल्या कारंजाच्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या डासाच्या अळ्या आढळून आल्या. तसेच शाळा प्रशासनाला पाणी कुठे साचू देऊ नका, अशा सूचनाही दिल्या. सांदीपनी शाळेत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या टायरमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या आढळून आल्या. शाळा प्रशासनाला याची जाणीव करून देत ते नष्ट करण्यात आले.