शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेची धुंदी चढल्यानेच दानवेंना दुष्काळ दिसला नाही- अशोक चव्हाण

By admin | Updated: January 23, 2017 18:55 IST

सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंच्या डोळ्यावर धुंदी आली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई दि. 23 - सत्तेची हवा डोक्यात गेल्याने रावसाहेब दानवेंच्या डोळ्यावर धुंदी आली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातला शेतक-यांच्या आत्महत्या आणि दुष्काळ दिसला नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, असे वक्तव्य करणा-या भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की, राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांची कुटुंबे रस्त्यावर आली. काँग्रेस पक्षाने संसद, विधानसभा आणि रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यानंतर सरकारने दुष्काळग्रस्तांना 4200 कोटींची तुटपुंजी मदत केली. काँग्रेस पक्षाला या मदतीचे श्रेय मिळू नये म्हणून असे वक्तव्य करणे दुर्दैवी असून, दानवे यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.(युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू, भाजपाचा सेनेला इशारा)(शिवसेनेने जाहीरनामा रिपिट करून दाखवला- राधाकृष्ण विखे पाटील)आठवड्याभरापूर्वी राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या बुलडाणा जिल्ह्यात एका शेतक-याने फुंडकरांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. त्याच जिल्ह्यात जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे राज्यातील शेतक-यांची क्रूर थट्टा असून, शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. या असंवेदनशील वक्तव्याबाबत दानवे यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, असे अशोक चव्हाण म्हणाले. याच जाहीर सभेत बोलताना दानवे यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा मला द्या मी बदलून देतो, असे वक्तव्य केले आहे. लक्ष्मीदर्शनाच्या गप्पा मारणा-या रावसाहेब दानवे यांनी किती लोकांना जुन्या नोटा बदलून दिल्या?, याची चौकशी करण्याची आवश्यकता असून बिहार प्रदेश भाजपाप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश भाजपने जुन्या नोटांच्या माध्यमातून काही मालमत्ता खरेदी केल्या आहेत का? याचीही चौकशी होणे गरजेचे आहे, असे चव्हाण म्हणाले.