शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

दुष्काळग्रस्त कुटुंबातील चिमुरडीचा टबात पडून मृत्यू

By admin | Updated: May 18, 2016 05:27 IST

लातूरमधील एका कुटुंबाच्या एक वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या टबात बुडून सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला.

ठाणे : मराठवाड्यात दुष्काळामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने उदरनिर्वाहासाठी ठाण्यात आलेल्या लातूरमधील एका कुटुंबाच्या एक वर्षाच्या मुलीचा पाण्याच्या टबात बुडून सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. या चिमुरडीचा मंगळवारी पहिला वाढदिवस होता, त्याआधीच तिचा करुण अंत झाला.ठाण्यातील भीमनगर भागात आलेल्या लातूर जिल्ह्यातील थोडगा येथील रहिवासी दयानंद वाघमारे यांच्या कुटुंबाने पाणी टंचाईमुळे सर्व भांडी भरुन ठेवली होती. त्यातीलच एका टबात बुडून परी ऊर्फ एकता (एक वर्ष) हिचा सोमवारी दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या महिन्यात वाघमारे हे एकटेच त्यांच्या सासरी भीमनगर भागात आले होते. ते छोटी-मोठी कामे करीत होते. मात्र त्यांची मोठी मुलगी सिमरन (पावणे तीन वर्ष) हिला कावीळ झाल्याने काही दिवसांपूर्वी ते आपल्या संपूर्ण कुंटुबाला येथे घेऊन आले. औषधोपचारानंतरही तिच्या प्रकृतीत फरक पडत नसल्याने ते आपल्या कुटुंबाला घेऊन पुन्हा गावी जाणार होते. त्यासाठी त्यांनी सोमवारी सांयकाळच्या गाडीची वेळही निश्चित केली होती. मंगळवारी एकताचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसाची त्यांनी तयारीही केली होती. सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास दयानंद हे पगार घेण्यासाठी गेले होते. घरी त्यांची पत्नी होती. एकता घरात रांगत-खेळत होती. त्यांची पत्नी थोड्यावेळ कामासाठी बाहेर गेली असता, एकता रांगत- रांगत पाण्याच्या टबात पडली. वाघमारे यांची पत्नी घरी येताच, त्यांचे लक्ष तिच्यावर गेले. त्यांनी तिला टबातून बाहेर काढले. शेजारच्यांच्या मदतीने तिला खासगी रुग्णालय नेले. परंतु तेथील डॉक्टरांनी तिला पोलिसांशी संबंधित प्रकरण असल्याने शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला वाडिया रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तेथेही डॉक्टरांनी तिच्यावर उपचारास टाळाटाळ केली. त्यानंतर तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.>वाडिया रुग्णालयात तिला आॅक्सिजन वेळेत दिले गेले असते, तर माझ्या मुलीचे प्राण वाचले असते. - दयानंद वाघमारे, एकताचे वडील