शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावरून लक्ष उडवण्यास वाद!

By admin | Updated: August 21, 2015 00:43 IST

महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. मात्र, पुरेशा व ठोस शासकीय उपाययोजना होत नसल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या सरकारविरूद्ध जनतेत प्रचंड आक्रोश आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी राज्य सरकारने हेतुपुरस्सर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद चिघळवला, अशी टीका वरिष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, यंदा शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही, अनेक जिल्ह्णांमध्ये पावसाळ्यातच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही. या परिस्थितीचा सामना करण्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार अपयशी ठरल्याने सर्वत्र संतापाची लाट आहे. त्यामुळेच शासनाने महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा वाद जाणीवपूर्वक पेटता ठेवून लोकांचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक लिखाण केल्याचा आक्षेप अनेक साहित्यिक, इतिहासकार व विविध क्षेत्रातील नामवंतांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शासकीय पुरस्काराबाबत असा वाद निर्माण होताच महाराष्ट्र सरकारने संबंधितांशी चर्चा करून तो शमवायला हवा होता. उलटपक्षी सरकारने ताठर भूमिका घेऊन वादात तेल ओतले. या वादाला हेतुपुरस्सर जातीय रंग देण्यात आला. हे सरकार जातीयवादी आहे, असा आरोप राणे यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक विधानांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. बाबासाहेब पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज घराघरात पोहोचल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, पुरंदरेंमुळे शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांमुळे पुरंदरे, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. मी कोणाला भीत नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. फडणवीसांना कोणाची भीती नसती तर त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा देखील वानखेडेवरच घेतला असता, असा टोलाही राणेंनी लगावला. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्याबद्दल राणे यांनी गृहमंत्रीपदही सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. (प्रतिनिधी)