शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

महापौर निवडीवरही वादाचे सावट

By admin | Updated: November 10, 2014 04:20 IST

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत या महिन्यात स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे

भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत या महिन्यात स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणूकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व राज्यस्थापनेत शिवसेनेचा सहभाग नसल्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाची मुदत संपत असल्याने ही निवडणूक १० डिसेंबर २०१४ पूर्वी होणे आवश्यक आहे. मात्र याबाबतीत कोकण आयुक्तांकडून कोणतेही परिपत्रक आद्याप जाहीर झालेले नाही, अशी माहिती मनपा सचिव अ‍ॅड. के.एस. सोळंकी यांनी दिली. तत्पूर्वी स्थायी समिती सभापतिपदाची मुदत संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. ही दोन्ही पदे आपल्या पदरात पडावीत म्हणून कोनार्क विकास आघाडी व भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळे काही नगरसेवकांना पुन्हा एकदा लक्ष्मीदर्शनाची संधी चालून आली आहे.नुकत्याच झालेल्या दिवाळीत कोनार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांनी लोणावळा-कार्ला बंगल्याचे नूतनीकरण करून तेथे नगरसेवकांची खास सोय केली होती. त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली. त्याचप्रमाणे महापालिकेत शिवसेना नगरसेवक काँग्रेसबरोबर विरोधी गटात आहेत. केंद्र व राज्यातील सत्तास्थापनेपासून शिवसेनेस मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे तणाव आहे. मात्र शिवसेनेस या वेळी दगाफटका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)