ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १४ - एका भोंदू बाबाने डोळे स्वच्छ करतो असे सांगत आषाढीसाठी आलेल्या भाविकांच्या डोळ्यात औषध घातल्याने १० वारक-यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली. असून त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निमखेड (जि. बुलढाणा) येथील दिंडी भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथील एका शेतामध्ये जेवणासाठी थांबली असताना महाराजाने डोळ्यात कचरा साचल्याचे सांगत औषध घातले. यामुळे त्यांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. नारायण मताजी ताटे (निमगाव, ता. सिंधखेड राजा, जि. बुलढाणा), शशिकला बाजीराव काळजोत (वय ६0, रा. किनगाव राजा, ता. सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), रामराव पांडुरंग गाडेकर (वय ५0, रा. धावरी, ता. लोहा, जि. नांदेड), यमुना गजानन सांगळे (वय ४५, जळगाव राजा, जि. बुलढाणा), रत्नमाला वामन मुंढे( वय ६0, नारायणगाव, ता. जळगावराजा, जि. बुलढाणा), द्रोपदी मारुती माटे (वय ६0, जळगावराजा, जि. बुलढाणा), विठाबाई ज्ञानदेव सुरडकर (वय ६५, रा. किनगावराजा, सिंधखेडराजा, जि. बुलढाणा), शांताबाई कुंडलिक मुंढे ( वय ६५, रा. किनगावराजा, ता. सिंधखेडराजा, बुलढाणा), मंगल नारायण शिंगणे (वय ५0, देऊळगावराजा, जि. बुलढाणा), संगीता विजय घिळे (वय ४0, किनगावराजा, ता सिंधखेडराजा, जि. बुलढाणा) यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे एका महाराजाने डोळे स्वच्छ करतो म्हणून भाविकांच्या डोळ्यात औषध टाकले होते. त्या रुग्णांना अॅलर्जी झाली होती. ते ठीक होतील.
- डॉ. प्रशांत शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय