शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

'अजिंक्यतारा'मुळे ता-यांची फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 09:12 IST

मॉरिशस येथे मराठी चित्रपटांच्या गौरवार्थ २१ ते २३ आॅगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा अचानक रद्द करण्यात आला आहे.

मॉरिशसमधील अजिंक्यतारा पुरस्कार सोहळा रद्द

मुंबई : मॉरिशस येथे मराठी चित्रपटांच्या गौरवार्थ २१ ते २३ आॅगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा अचानक रद्द करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विमानतळावर पोहोचलेले सुमारे ३0 कलावंत आणि अन्य संबंधित मंडळी मिळून तब्बल ८० जणांना विमानतळावरूनच माघारी परतावे लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी पहाटे विमानतळावर पोहोचल्यावरच या सर्वांना हा सोहळा अचानक रद्द झाल्याची बातमी समजली आणि त्यांना धक्काच बसला.‘अजिंक्यतारा’चा पहिलावहिला पुरस्कार सोहळा होता आणि तो धुमधडाक्यात साजरा करण्याचे आयोजकांनी ठरवले होते. ज्यांना पुरस्कार देणार होते, त्यांची नामांकनेही जाहीर झाली होती आणि त्यातून अंतिम विजेत्यांची घोषणा मॉरिशसमध्ये करण्यात येणार होती. पुरस्कार वितरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र आता या सगळ्यावर पाणी पडले आहे. हा सोहळा पूर्णत: रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कलाकारांसह जवळपास ८० जण मॉरिशसला रवाना होणार होते. त्यासाठी हे सर्वजण विमानतळावर वेळेत दाखल झाले. मात्र पहाटे चारच्या सुमारास पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आल्याचा निरोप हाती पडताच त्यांना धक्काच बसला. सोहळा रद्द करण्याचे कारण न समजल्याने संभ्रम अधिकच वाढला. परिणामी, या कलाकारांना मॉरिशसऐवजी आपापल्या घरी परतावे लागले. यामध्ये अभिजित केळकर, मानसी नाईक, सई ताम्हणकर, पुष्कर श्रोत्री, नेहा पेंडसे, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, संस्कृती बालगुडे, पूजा सावंत तसेच काही बालकलाकार आणि त्यांचे पालक असल्याचे समजते.हा सोहळा अचानक रद्द होण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तरी या पुरस्कार सोहळ्याच्या एका आयोजक कंपनीनेच त्यातून माघार घेतल्याने अशी वेळ ओढवल्याचे समजते. तथापि, या सोहळ्याचे आयोजक सुपरविस्टा एन्टरटेन्मेंटने हा पुरस्कार सोहळा रद्द केल्याला दुजोरा देतानाच हा सोहळा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.