शहरं
Join us  
Trending Stories
1
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
2
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
3
काळजी घ्या! व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका मिळाली, त्यावर क्लिक केले, बँक खात्यातून २ लाख रुपये उडाले
4
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
5
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
6
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
7
"तुम मराठी लोग भंगार हो..." नाशिकमध्ये परप्रांतीयानं दाखवला माज; नेमकं काय घडली घटना?
8
सरप्राइज मिळालं अन् मनातली ती भीती दूर झाली! वादळी शतकी खेळीनंतर रिंकू सिंहनं शेअर केली खास गोष्ट
9
"ट्रम्प असे आहेत जे सकाळी मोदींशी हात मिळवतील, रात्री पाठीत खंजीर खुपसतील," कोणी केली इतकी मोठी टीका?
10
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
11
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
12
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
13
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
14
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
15
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
16
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
17
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
18
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
19
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
20
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!

कोल्हापूर विभागाला दुहेरी मुकुट

By admin | Updated: October 8, 2015 01:10 IST

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : मुलांत लातूर, तर मुलींच्या गटात पुणे उपविजेते

कै. प्रा. वीरसेन पाटील क्रीडानगरी, शिरोळ : येथील श्री पद्माराजे विद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील शालेय कबड्डी स्पर्धेत मुली व मुलांच्या कोल्हापूर संघाने दुहेरी अजिंक्यपद पटकावून राज्यात वर्चस्व सिद्ध केले. शिरोळ येथे सोमवारपासून राज्यस्तरीय शालेय कबड्डी चाचणी स्पर्धेला प्रारंभ झाला होता. या स्पर्धेत मुली व मुलांचे एकूण १५ संघ सहभागी झाले होते. क्रीडा युवक सेवा संचनालय पुणेद्वारा जिल्हा क्रीडा परिषद, बाल शिवाजी मंडळ, शिरोळ व दत्त महाविद्यालय, कुरुंदवाड यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेतून १४ आॅक्टोबरला तेलंगणा राज्यात होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात आला.पुरुष विभागात कोल्हापूर विरुद्ध लातूर संघात प्रथम क्रमांकासाठी सामना झाला. यावेळी झालेल्या सामन्यात एकतर्फी गुणांची आघाडी घेत कोल्हापूर (३४) संघाने लातूर (१८) संघावर १६ गुणांनी विजय मिळविला. त्यामुळे द्वितीय क्रमांकाचा मानकरी लातूर विभाग संघ ठरला. मुली विभागात प्रथम क्रमांकासाठी कोल्हापूर विरुद्ध पुणे संघात चुरशीचा सामना झाला. क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा हा सामना रंगत असताना मध्यंतरापर्यंत कोल्हापूर ११, तर पुणे संघ ७ असे गुण झाले. त्यानंतर कोल्हापूर संघाने सांघिक शक्ती व पकडीच्या जोरावर पुणे संघावर ३१ गुणांनी सहज विजय मिळविला. पुणे संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले.विजेत्या संघाना कै. प्रा. वीरसेन पाटील स्मृतिचषक व सन्मानपत्र देऊन आ. उल्हास पाटील, उद्यानपंडित गणपतराव पाटील, क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल, संचालक एन. बी. मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, संजय पाटील-यड्रावकर, अनिलराव यादव यांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचे संयोजन उत्कृष्ट केल्याबद्दल बाल शिवाजी मंडळाचे अमरसिंह पाटील, प्रा. आण्णासो गावडे यांचा सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य संघाची घोषणाशिरोळ येथील कै. प्रा. वीरसेन पाटील क्रीडानगरी येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून तेलंगणा राज्यात १४ आॅक्टोबरला होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची यावेळी निवड करण्यात आली. याची घोषणा जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे यांनी केली.राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झालेला राज्यस्तरीय संघ असा - मुलांच्या संघात- सूरज महाडिक (कोल्हापूर), प्रमोद माने-गावडे (कोल्हापूर), संदीप राठोड (लातूर), आकाश गायकवाड (मुंबई), तुषार माळोदे (नाशिक), नरेश माने (कोल्हापूर), दिनेश वडार (कोल्हापूर), ज्ञानेश्वर नागावे (औरंगाबाद), दीपक वडाजे (लातूर), निशांत देवकर (मुंबई), सुमित घोम (अमरावती) प्रवीण म्हात्रे (मुंबई) यासह राखीव खेळाडू म्हणून तुषार भोईर (औरंगाबाद), रोहिदास सूर्यवंशी (लातूर), संकेत कुरकुटे (पुणे) यांची निवड झाली.मुलींच्या संघात- सोनाली हेळवी (कोल्हापूर), समरीन बुरोडकर (कोल्हापूर), ऐश्वर्या शिंदे (पुणे), सायली शिंदे (कोल्हापूर), प्रणाली लहानगे (नाशिक), सृष्टी चाळके (मुंबई), प्रेमा जमादार (पुणे), दीपा बुट्टे (औरंगाबाद), लीना जमदाडे (पुणे), तेजश्री चौगुले (मुंबई), अश्विनी पोमन (औरंगाबाद), पूनम राठोड (कोल्हापूर) यासह राखीवसाठी ज्योती पाटील (पुणे), ऋती जारंडर (नाशिक), ऐश्वर्या ताटे (कोल्हापूर) यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली.राष्ट्रीय खेळाडू सुवर्णा बारटक्के यांनी स्पर्धेचे निरीक्षणकेले. तसेच निवड समितीचे सदस्य अनिल सातव, गीता साखरे, शंकर पवार यांनी संघातील खेळाडूंची निवडी केली.शिरोळ येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलींच्या कोल्हापूर संघास बक्षीस देताना आमदार उल्हास पाटील. शेजारी आण्णासाहेब गावडे, क्रीडा उपसंचालक नरेंद्र सोपल, संचालक एन. बी. मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे, रावसाहेब देसाई, अनिल यादव व इतर मान्यवर उपस्थित होते.