शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या नशेत मित्रानंच हत्या, आरोपी फरार

By admin | Updated: February 15, 2017 20:25 IST

औसा तालुक्यातील हरेगाव येथे एका मित्राने दारुच्या नशेत आपल्या मित्राची हत्या केल्याची घटन मंगळवारी रात्री उशीरा घडली.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 15 - औसा तालुक्यातील हरेगाव येथे एका मित्राने दारुच्या नशेत आपल्या मित्राची हत्या केल्याची घटन मंगळवारी रात्री उशीरा घडली. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून, आरोपी फरार आहे. आरोपीच्या अटकेसाठी औसा पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
 
औसा तालुक्यातील हरेगाव येथील मारोती बाबुराव माने (५२) हे मंगळवारी रात्री घरी झोपले असता त्यांचा मित्र खंडू सुरवसे (३०) हा घरी आला. त्यांना झोपेतून उठवून घराबाहेर घेऊन गेला. मारोती बाबुराव माने हे पहाटेपर्यंत घरी आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता गावात त्यांचा मृतदेह आढळून आला.
 
या प्रकरणी अधिक चौकशी केली असता त्यांचा मित्र खंडू सुरवसे हा गावातून फरार असल्याचे समजले. मारोती माने यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळल्या आहेत. या घटनेची माहिती औसा पोलिसांना देण्यात आली. औसा पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.  फरार असलेले आरोपी खंडू सुरवसे याच्या अटकेसाठी औसा पोलीसांचे पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गणेश किंद्रे यांनी दिली़
हत्येचं कारण अस्पष्ट  
मृत मारोती बाबुराव माने यांच्या हत्येचं कारण मात्र बुधवारी दुपारपर्यंत अस्पष्टच होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी मारोती माने आणि खंडू सुरवसे या दोघांनी पूर्वी पार्टी केली होती. आधून मधून हे दोघे दारु ढोसत होते. दरम्यान मंगळवारी रात्रीही या दोघं एकत्र बसून दारू प्यायले होते.  दरम्यान दारुच्या नशेतच खंडूने मारोती माने यांची हत्या केली असावी, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
खंडूचा स्वभाव विक्षिप्त
हरेगाव येथील खंडू सुरवसे हा पूर्वीपासूनच विक्षिप्त स्वभावाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले़ तो दारूच्या नशेत अनेकांना त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. मारहाण होण्याच्या भीतीने त्याची आई घरातून मंगळवारी निघून गेली होती. शिवाय, तो शेजा-यांनाही दारू ढोसून त्रास द्यायचा यातूनच त्याच्याविरोधात यापूर्वी तीन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत.