शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १९ डॉक्टरांचा कारभार संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:56 IST

छुप्या मार्गाने गर्भलिंग तपासणी : कारवाईचा स्कॅनर फिरणार, ‘हिटलिस्ट’नुसार हालचालीवर गोपनीय नजर

एकनाथ पाटील--कोल्हापूर --गर्भलिंग तपासणीमध्ये जिल्ह्यातील १९ डॉक्टरांचा संशयास्पद कारभार सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ग्रामीण भागात डॉक्टर बनून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांमध्ये काही पदवीधारकांसह बोगस डॉक्टरांचा समावेश आहे. हे सर्व डॉक्टर ‘हिटलिस्ट’वर असून, त्यांच्या हालचालीवर गोपनीय नजर ठेवून लवकरच त्यांच्यावर कारवाईचा स्कॅनर फिरविला जाणार आहे. डॉक्टर हा समाजातील एक महत्त्वाचा दुवा मानला जातो. डॉक्टर बनण्यासाठी किमान सहा वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागतात. मात्र, शहरातील नामांकित हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कंपौंडरनी आता झटपट पैसा मिळविण्यासाठी स्वत:च डॉक्टर बनून ग्रामीण भागात राजरोस दवाखाने सुरू केले आहेत. डॉक्टर नसून कंपौंडर आहे याची पुसटशीदेखील परिसरातील नागरिकांना कल्पना नसते. गर्भलिंग चाचणीसह गर्भपात करण्यामध्ये ते पटाईत आहेत. दवाखान्याची नोंदणी शासनदरबारी नसते. वर्षापूर्वी जुना वाशी नाका चौकात आलिशान कारमध्ये गर्भलिंग तपासणी करताना बोगस डॉ. हिंदुराव पोवार, डॉ. हर्षल नाईक, चालक सुशांत दळवी या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. पोलिस तपासामध्ये या रॅकेटची व्याप्ती मुंबईपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले होते. या कारवाईनंतर अन्य डॉक्टरांनी हा व्यवसाय जिल्ह्यात बंद ठेवून आपले बस्तान कर्नाटकात बसविले व ते या ठिकाणी रातोरात गर्भलिंग चाचण्या करत आहेत. पिराचीवाडी येथील साताप्पा रोडे याच्या घरावर छापा टाकल्यानंतर तो बोगस डॉक्टर असल्याचे पुढे आले. रोडे हा बोगस डॉक्टर असताना रुग्णांवर तो कंपौंडरच्या अनुभवाच्या जोरावर उपचार करत होता. गर्भलिंग चाचणीसह गर्भपात करण्यामध्ये त्याचे संपूर्ण कुटुंब पटाईत आहे. आजपर्यंत त्याच्याकडे शासनाचा एकही अधिकारी चौकशीसाठी गेला नव्हता. रोडेसारखे अनेकजण ‘बोगस डॉक्टर’ बनून राजरोस गर्भलिंग चाचण्यासह गर्भपात करीत आहेत. चायना बनावटीची सोनोग्राफी यंत्रे अवघ्या एक लाख ७० हजार रुपयांना खरेदी करून त्यावर लाखो रुपयांची कमाई हे डॉक्टर करत आहेत.मोकाट डॉक्टर गर्भलिंग तपासणीचे सांगली, कोल्हापूर ते कर्नाटक असे मोठे रॅकेट असून, त्यामध्ये डॉक्टर व एजंटांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी गावोगावी खुलेआम डॉक्टर म्हणून मिरवणाऱ्यांची चौकशी करून संशयास्पद हालचाली दिसल्यास उचलबांगडी करणे गरजेचे आहे. कारवाईची भीती न बाळगणारे डॉक्टर गर्भलिंग चाचण्यांबरोबरच गर्भपात करीत फिरत आहेत. अकार्यक्षम समितीजिल्ह्यातील बोगस डॉक्टरांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बोगस डॉक्टर शोधमोहिमेंतर्गत समिती तालुकास्तरावर स्थापन केली आहे. गावागावांत सुरू असलेल्या दवाखान्यांची व डॉक्टरांची चौकशी करण्याचे अधिकार या समितीला आहेत; परंतु ही समिती गावागावांत पोहोचलेली नाही. जिल्ह्यातील डॉक्टरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. रजिस्टर नसणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे. यासंबंधी शनिवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासोबत बैठक झाली. - डॉ. एल. एस. पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, सीपीआर.