शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नशेच्या आहारी जाऊन घरातच साठवला कचरा!

By admin | Updated: May 21, 2016 02:12 IST

कचऱ्याने भरलेले घर आणि त्याच्या सहन न होणाऱ्या दुर्गंधीने मुलुंडमधील झवेर मार्गावरील लक्ष्मीसदन वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

चेतन कंठे,

मुंबई- जिवंत कोंबड्या, मांजरी, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, उरलेले अन्न... अशा विविध प्रकारच्या कचऱ्याने भरलेले घर आणि त्याच्या सहन न होणाऱ्या दुर्गंधीने मुलुंडमधील झवेर मार्गावरील लक्ष्मीसदन वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने हा प्रताप केला असून याविषयी स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे.मुलुंडमध्ये गुरुवारी एका वृद्ध महिलेच्या घरात आठ ट्रक कचरा सापडल्याने खळबळ माजली होती. त्यातच शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील लक्ष्मीसदन वसाहतीतील उदय जोशी (४०) यांनी राहत्या घराची कचराकुंडीच केल्याचे निदर्शनास आले. जोशी यांनी हा कचरा घरात साठवून ठेवल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. घरात साठविलेल्या कचऱ्यामुळे वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे आरोग्यास धोका संभवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे रोगराईच्या भीतीने वसाहतीतील लहान मुलांना आवारात खेळण्यास पाठवू शकत नसल्याचे रहिवासी सुनील गुप्ते यांनी सांगितले. ‘लक्ष्मीसदन’ वसाहत तीन मजल्यांची असून येथे ४० कुटुंबे वास्तव्यास आहेत. जोशी यांच्या या अजब वर्तवणुकीविषयी वसाहतीतील रहिवाशांनी मिळून वसाहतीच्या समितीकडे तक्रार केल्याचे सुनील गुप्ते यांनी सांगितले. शिवाय, मुलुंडमधील चुनीलाल सावला यांच्या घरातील कचऱ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता याविषयी पालिकेकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.