शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात दुष्काळग्रस्त परततील

By admin | Updated: June 12, 2016 04:44 IST

राज्यातील दुष्काळी भागातून विशेषत: नांदेडमधून मुंबईमध्ये आलेले स्थलांतरीत एका आठवड्यात त्यांच्या मूळ गावी परततील, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.

मुंबई : राज्यातील दुष्काळी भागातून विशेषत: नांदेडमधून मुंबईमध्ये आलेले स्थलांतरीत एका आठवड्यात त्यांच्या मूळ गावी परततील, अशी माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली. दुष्काळी भागातून मुंबई, ठाण्यात स्थलांतरीत झालेल्यांना सुविधा मिळत नसल्याचे वृत्त वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाने याची गांभीर्याने दखल घेत जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने मुंबईत किती कुटुंबे स्थलांतरीत झाली आहेत, याची आकडेवारी मुंबई महापालिकेला देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शुक्रवारच्या सुनावणीत महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी राज्यातील दुष्काळी भागातून मुंबईत ३९६ कुटुंबे आल्याची माहिती खंडपीठाला दिली. ‘मुंबईत एकुण ३९६ कुटुंबांतील एकूण १,०४४ दुष्काळग्रस्त नागरिक स्थलांतरीत झाले. मे महिन्याच्या अखेरीस अनेक कुटुंबे त्यांच्या मूळ गावी परतली. अद्याप २० कुटुंबे म्हणजे ९६ दुष्काळग्रस्त नागरिक मुंबईत आहेत. एका आठवड्यात ही कुटुंबेही परत जाण्याची शक्यता आहे,’ अशी माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली. तसेच या कुटुंबांच्या अन्न व निवाऱ्याची सोय करण्यात आली होती. त्यांची वैद्यकीय चिकित्साही करण्यात आली. फिरते शौचालयही यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते,’ अशीही माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली.मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी स्थलांतरीतांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करणार असल्याचेही उच्च न्यायालयाला सांगितले. (प्रतिनिधी) पालिकेला दिले निर्देश एका आठवड्यानंतर स्थलांतरीतांची स्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकार व महापालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.