शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ आढावा बैठक झटपट उरकली!

By admin | Updated: August 24, 2015 01:27 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने औरंगाबादेत आलेले मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्ताने औरंगाबादेत आलेले मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांनी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा हातघाईवर उरकून घेतला. विभागातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात आल्याने काँग्रेससह शिवसेनेच्या आमदारांनी टीकेचा सूर आळवला. रविवारी मराठवाड्यातील दुष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. बैठकीला महसूलमंत्री एकनाथ खडसे अर्धा तास उशिराने पोहोचले; तर शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी परिवहनमंत्री दिवाकर रावते व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे दोघेच उपस्थित होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह भाजपाच्या काही आमदारांनी बैठकीला हजेरी लावली. मराठवाड्यातील इतर लोकप्रतिनिधींना बैठकीचे निमंत्रणच नव्हते. त्यामुळे कोणीच तिकडे फिरकले नाही. मुख्यमंत्र्यांनी घाईगडबडीत मराठवाड्यातील दुष्काळाचा गंभीर विषय हाताळला, अशी टीका काँग्रेस व शिवसेनेच्या आमदारांनी केली. दुष्काळी परिस्थितीवर स्वतंत्र मंत्रिमंडळाची बैठक लावली असती तर काहीतरी निष्पन्न झाले असते, असे मत नांदेडचे आ. नागेशराव आष्टीकर यांनी व्यक्त केले. तर आमदारांना निमंत्रण दिले नसल्याबद्दल आ. संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)