शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

२०१९पर्यंत दुष्काळमुक्ती

By admin | Updated: November 21, 2015 02:20 IST

जलयुक्त शिवार योजनेमधून आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. त्यासाठी १४०० कोटी खर्च करून सहा लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल, अशी व्यवस्था केली आहे.

पाटण (जि. सातारा) : जलयुक्त शिवार योजनेमधून आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. त्यासाठी १४०० कोटी खर्च करून सहा लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल, अशी व्यवस्था केली आहे. २०१९पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.मरळी, दौलतनगर येथे आमदार शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी मंत्री दिवाकर रावते, गिरीश महाजन, डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सत्यजीत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आघाडी शासनाने १५ वर्षांत पश्चिम महाराष्ट्राला १३ हजार कोटी दिले आहेत. आम्ही एका वर्षात आठ हजार कोटी दिले. उसाचा प्रश्न चिघळला असून, शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली पाहिजे यासाठी कारखान्यांना २००० कोटी रुपये दिले आहेत. कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच एफआरपीचा प्रश्न सुटेल, असे सांगून ते म्हणाले, सिंचनामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. (प्रतिनिधी)जिथे पवार; तिथे घोटाळा! : राज्यात इतके घोटाळे करून ठेवले आहेत की, ‘जिथे पवार; तिथे घोटाळा’ झाला आहे. मातीचा बंधारा बांधतो म्हणायचे आणि तिथे काँक्रीट धरणे बांधली. पाणी मात्र उपलब्ध नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. शंभूराजना लवकरच लाल दिवा : शंभूराज देसाई यांना लाल दिव्याची गाडी देण्याबाबत मंत्री दिवाकर रावतेंसमवेत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.