शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ कायमचा संपवा!

By admin | Updated: December 11, 2014 00:46 IST

मोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास

विधिमंडळ अधिवेशन: दोन दिवसाच्या गोंधळानंतर चर्चेला सुरुवातअतुल कुलकर्णी - नागपूरमोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास ६० ते ६५ सदस्यांनी दिवसभराच्या भाषणात दुष्काळाचे विदारक चित्र सभागृहासमोर मांडले. दुष्काळ कायमचा संपवा, त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशा आग्रही मागण्या नव्याने आलेल्या सदस्यांनी केल्या. त्यांचे हे रूप पाहून सभागृहातील ज्येष्ठांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. एरवी सायंकाळनंतर रिकाम्या बाकांसमोरील चर्चा पाहण्याची सवय लागलेल्या सभागृहाच्या भिंतीदेखील भरलेले सभागृह पाहून अचंबित झाल्या असतील!अर्धे सदस्य पहिल्यांदा निवडून आलेले. त्यांच्या मनाचा अचूक वेध दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी आपल्या भाषणातून घेतला. नवीन आलेले सदस्य अपेक्षेने येथे आले आहेत. येताना शेतकऱ्यांच्या भावना विधानसभेत मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वस्त करून आले आहेत. आम्हीदेखील पहिल्यांदा सभागृहात आलो तेव्हा हेच केले होते. मात्र दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा आमच्या पदरी निराशा आहे. आम्ही दोन्ही बाजूचे सभागृह पाहिले आहे. सत्ताधारी आज विरोधक आहेत आणि विरोधक आज सत्ताधारी आहेत. दोघांच्या बसण्याच्या जागा बदलल्या आहेत पण त्या जागांवरून जे बोलले जात होते त्यात काहीच बदल झालेला नाही... एवढी वर्षे आम्ही बोलत आहोत, येथे येतो, चर्चा करतो, मागण्या मांडतो, पण पदरात काहीच पडत नाही... शेतकऱ्यांसाठी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल की नाही... अशा शब्दात बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अर्जुन खोतकर यासारख्या अनेकांनी नेमके जखमेवर बोट ठेवले तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बाके वाजवून याचे स्वागतच केले. बागलणच्या आ. दीपिका चव्हाण या नव्याने आलेल्या महिला सदस्यांनी आपले लिखीत भाषण वाचले पण त्यामागचा भाव हाच होता.