शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

ड्रोण व डॉग स्कॉडलाही हल्लेखोर अस्वलाचा गुंगारा

By admin | Updated: October 9, 2016 13:17 IST

ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे.

५० जणांचे पथक शोधात : आतापर्यंत तिघांना केले ठारविवेक चांदूरकरबुलडाणा, दि. ९ : ज्ञानगंगा अभयारण्यालगतच्या गावांमध्ये हल्ला करून तिघांना ठार करणाऱ्या अस्वलाचा शोध सध्या वनविभागाच्यावतीने युद्ध पातळीवर सुरू आहे. याकरिता राज्यातील प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉड बोलाविण्यात आले असून,ड्रोणचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही अस्वल या पथकाच्या निदर्शनास पडले नाही. तीन जण अस्वलाच्या हल्ल्यात ठार झाल्याने एकीकडे नागरिकांचा दबाव वाढत आहे तर दुसरीकडे अस्वल निदर्शनास येत नाही आहे.    डोंगर खंडाळा गावाजवळ अस्वलाने एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना गुरूवारी घडली. यासह चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावातही अस्वलानेहल्ला करून एका शेतकऱ्याला ठार केले. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारयांनी अस्वलाला ठार करण्याचे आदेश दिले आहेत.

या आदेशानंतर वनविभागाच्या चमुने अस्वलाचा शोध घेतला. मात्र त्यांना अस्वल निदर्शनास पडले नाही. त्यानंतर पुन्हा अस्वलाने हल्ला करून शेतकऱ्याला ठार केल्याने आता बुलडाणा, अमरावती व अकोला येथील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी या अस्वलाचा शोध घेत आहेत. याकरिता वनविभागाकडे असलेल्या प्राविण्यप्राप्त डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले आहे. स्कॉडमधील कुत्र्याने अस्वलाचा माग घेतला असून, कोणत्या दिशेने अस्वल आल्याचे दाखविले. गत तीन दिवसांपासून आता जवळपास ५० जणांची चमू या अस्वलाचा शोध घेत आहे. अनेक अस्वलांमुळे पथक संभ्रमात या जंगलात ४० पेक्षा जास्त अस्वल आहेत. त्यामुळे हल्लेखोर अस्वल कोणते आहे, याचा शोध घेणे वन विभागाच्या पथकाला कठीण होत आहे. अस्वलाला ठार केल्यानंतर हेच हल्लेखोर अस्वल असल्याचे वनविभागाला सिद्ध करावे लागणारआहे.  दुसरीकडे सध्या अस्वलांचा प्रजननाचा काळ सुरू आहे. त्यामुळेही अस्वली एकत्र येत आहेत.