शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

चालकांचा हलगर्जीपणा ; दोन बसची धडक, 11 जण जखमी

By admin | Updated: August 28, 2016 22:25 IST

दोन चालकांच्या हलगर्जीपणामुळे एस.टी.ची धडक होऊन ११ प्रवासी जखमी झाले.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर, दि. 28 - दोन चालकांच्या हलगर्जीपणामुळे एसटीची धडक होऊन ११ प्रवासी जखमी झाले. ही घटना पंढरपूर डेपोत घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.रविवारी (क्र. एम.एच.१२/ई.ए. ६३८८) पंढरपूर-तनाळी व (क्र. एम.एच.0७/सी. ७१५६) सोलापूर-कराड या दोन एसी डेपोत प्रवेश करण्यासाठी दाखल झाल्या. यावेळी दोन्ही एसटी चालकामध्ये पुढे जाण्याची घाई लागली होती. यातूनच सोलापूर-कराड बसची पंढरपूर-तनाळी मसला धडक बसली. यामुळे तनाळी बसमधील ११ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार करून विना तिकीट मुक्कामाच्या ठिकाणी सोडण्यात आले. यासह जखमी प्रवाशांना प्रत्येकी ५०० रूपयाची आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे.या अपघातामध्ये दोन्ही बसचे ३० व २५ हजार असे एकूण ५५ हजार रूपयाचे नुकसान झाले आहे. बसस्थानकातच हा प्रकार घडल्यामुळे इतर प्रवाशी देखील घाबरले होते. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचा गैरसमज झाला होता. पण चालकांच्या हलगर्जीपणाचा प्रवाशांना फटका बसला. या प्रकरणी रात्री उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.