शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रंगांधळेपण असणारे चालक सेवेत नाहीत

By admin | Updated: July 15, 2016 03:24 IST

रंगांधळेपण असलेल्या १९८ चालकांना एसटी महामंडळाकडून अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ते अनुवंशिक असल्याने वाहनचालकांचा काही दोष नसल्याचे पुढे आले.

मुंबई : रंगांधळेपण असलेल्या १९८ चालकांना एसटी महामंडळाकडून अपात्र ठरविण्यात आले होते. मात्र ते अनुवंशिक असल्याने वाहनचालकांचा काही दोष नसल्याचे पुढे आले. याबाबत गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिवहन मंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी चालकांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनानंतरही ‘त्या’ चालकांना अद्यापही सेवेत सामील करून घेतलेले नाही. याविषयी लवकरच निर्णय होईल, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. राज्यभरातील १९८ बसचालकांना रंगांधळेपण असल्याने अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र हा निर्णय वाहनचालकांवर अन्याय करणारा असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. या निर्णयाची भविष्यात फारतर अंमलबजावणी करावी. परंतु यापूर्वी घडलेल्या अशा घटनांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करून ठाणे, रत्नागिरी विभागातील बस वाहनचालकांसह सेवेतून कमी केलेल्या वाहनचालकांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत अपवादात्मक बाब म्हणून शासनाला निर्देश देण्याची मागणी गेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात करण्यात आली. रंगांधळेपणा व रातआंधळेपणा हे अनुवंशिक असल्यामुळे संबंधित वाहनचालकांचा काही दोष नसल्याचेही त्या वेळी स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार ज्यांना सेवेतून कमी केलेले आहे त्यांना सेवेत सामावून घेण्याचे निर्देश सभापतींकडून देण्यात आले होते. त्या वेळी परिवहन मंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सेवेत सामावून घेण्याचे आश्वासनही दिले. तरीही चालकांना सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. यासंदर्भात एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांना विचारले असता, एसटी बोर्डाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. लवकरच त्यावर परिपत्रक काढण्यात येईल, अशी माहिती दिली. (प्रतिनिधी)