शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

ठिबक सिंचनाचे वाजले तीन तेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 01:22 IST

पुरंदर तालुक्याला बारमाही बागायती बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे स्वप्न आजही कागदावरच राहिले

भुलेश्वर : दुष्काळी पुरंदर तालुक्याला बारमाही बागायती बनवण्याचे स्वप्न साकार करणाऱ्या पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे स्वप्न आजही कागदावरच राहिले असून, गेली अनेक वर्षे सुरू असणारी ही योजना आजही पूर्णत्वाला गेली नाही. उलट दुरुस्तीअभावी खिळखिळी झाली आहे. योजनेच्या दुरुस्तीसाठी कोणताही निधी देण्यात आला नाही. या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट असणाऱ्या ठिबक सिंचन योजनेचे तीन तेरा वाजले आहेत.पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ही योजना सुरू असताना एका तासाला चौदा हजार रुपये बिल येते, तर दिवसाला एक लाख दहा हजारांपर्यंत बिल येते. एक एमसीएफटी पाण्यासाठी ५२,००० रुपये मोजावे लागतात. यामुळे पाण्याचे पैसे भरल्यानंतर लगेचच पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नाही. पैसे भरल्यानंतर पाण्याकडे डोळे लावून वाट पाहावी लागते. पाणी पाहिजे असल्यास खासगी माणसाकडे पैसे भरावे लागतात. नाहीतर कामधंदा सोडून सासवडला भरावे लागते. पाणी कधी येणार याची माहितीही मिळत नाही. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा जन्मच ठिबक सिंचन पद्धतीने झाला. यासाठी संस्था उभारण्याचे काम बाकीच आहे. सर्वांना समान पाणीवाटप करण्यासाठी पाणी संस्था उभ्या राहणे गरजेचे आहे. सध्या पुरंदर तालुक्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सुटते. अनेक शेतकऱ्यांना याचा लाभही मिळतो. पुण्याचे रोजचे वापराचे, वाया जाणारे पाणी मुळा-मुठा नदीमध्ये येते. कोरेगाव मूळ या ठिकाणाहून पुरंदर उपसा जलसिंचन योजनेतून उचलले जाते. यामुळे दुष्काळी पुरंदर तालुक्याला ऐन उन्हाळ्यात पाणी मिळते. मात्र, संपूर्ण क्षेत्राला आजही पाणी मिळाले नाही.