शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इथे पिण्यासाठी पाणी मिळेना अन लगीनघाई शौचालय बांधण्याची?

By admin | Updated: March 6, 2017 03:27 IST

जिल्ह्यात सर्वत्र प्रशासनाने हगणदारी मुक्तीचा विडा उचलला असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत.

रविंद्र साळवे,मोखाडा- मोखाड्यासह जिल्ह्यात सर्वत्र प्रशासनाने हगणदारी मुक्तीचा विडा उचलला असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याची कामे युद्ध पातळीवर सुरु आहेत. जिल्हा प्रशासनाने सुद्धा सक्त आदेश दिले असून सर्वच प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ग्रामपंचयतीला मिटिंगा घेऊन शौचालय बांधण्यास सक्ती करत आहेत परंतु दरवर्षीच मोखाडा तालुका भीषण पाणी टंचाईने होरपळत असताना पिण्यासाठी पाणी नाही त्यात शौचालयासाठी पाणी कुठून आणायचे असा सवाल आदिवासी बांधव प्रशासनाला विचारत आहेत.यामुळे योजना राबविताना प्रशासनाने फक्त देखावा करून चालणार नाही तर त्यासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचं आहे मोखाडा तालुक्यात २७ ग्रामपंचायती असून स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत शौचालय बांधण्याचे काम सुरु आहे १२ हजाराचे अनुदान मिळत असल्याने लाभार्थी सुद्धा समाधानी आहे असे असले तरी शौचालयासाठी मुबलक पाणी गरजेचं आहे परंतु मोखाडयात भीषण पाणी टंचाईची दाहकता भोगणाऱ्या आदिवासीना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे मोखाड्यातील टँकरने पाणी पुरवठा करण्याचे १३ प्रस्ताव पडून आहेत २४ तासात प्रस्तावाला मंजुरी देण्याचे धोरण असतांना देखील जिल्हाधिकारी साहेब झोपेतच आहेत यामुळे शौचालय बांधण्याची सक्ती करणाऱ्या प्रशासनाने प्रथमता पाण्याची व्यवस्था करणे गरजेचं आहे अन्यथा शासनाची महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियानाची योजना नेहमीच्या योजना प्रमाणे बासनात गुंडाळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.>स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून महिलांनी शौचालयात जावे ही प्रशासनाची संकल्पना योग्य आहे. परंतु यासाठी प्रथमता प्रशासनाने पाण्याचा प्रश्न सोडवायला हवा अन्यथा ही योजना राबविली तरी यशस्वी होणार नाही इथे प्यायला पाणी नाही आणि शौचालयासाठी पाणी कुठून आणणार? याचा विचार प्रशासनाने आधी करावा.- प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य पालघर