शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्यात झाला महाघोटाळा

By admin | Updated: February 18, 2017 02:11 IST

पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार

पुणे : पुणे शहराचा विकास आराखडा मंजूर करताना काही कोटी रुपयांचा व्यवहार झाला असून या महाघोटाळ्याबाबत आपण विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले़ काँग्रेस भवनमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते़ पुण्याचा विकास आराखड्यातील रस्त्याचे आरक्षण कोणत्या पुढारी, बिल्डरच्या सांगण्यावरुन बदल करण्यात आला़ हा विकास आराखडा बिल्डरांनी तयार केल्याचे सांगितले जात आहे़ येथील वाड्यांवरही आरक्षण टाकण्यात आले आहे़ गेल्या अडीच वर्षात भाजप सरकारने पुणेकरांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले आहे़ मागील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साडेहजार कोटींची घोषणा केली होती़ त्यापैकी ६ रुपयांचीही तरतुद केलेली नाही़ नुकतेच ते पुण्यात येऊन गेल्याचे समजले़ पण कोणतीही घोषणा केली नाही, याचे आश्चर्य वाटतंय़ भाजपने पुणेकरांना गृहीत धरण्याचे काम केले आहे़ पुणेकरांनी त्यांना २ खासदार, ८ आमदार निवडून दिले़ त्यांचे पुण्यावर खूप प्रेम आहे़ त्यामुळे गेल्या अडीच वर्षात पुण्याला केवळ १९ लाख रुपये मिळाले आहेत, अशी टीका त्यांनी केली़ शैक्षणिक हब व माहिती तंत्रज्ञानाचे शहर म्हणून पुण्याचा नावलौकिक झाला हा या २ वर्षात झालेला नाही़ आज जगात पुण्याचे जे नाव घेतले जाते़ त्याचे शंभर टक्के श्रेय हे काँग्रेसला असल्याचे सांगून विखे म्हणाले, भाजप आणि शिवसेनेचा सरकार म्हणून काय भूमिका आहे, हे लोकांना ऐकायचे होते़ पण, त्या दोघांकडे कुठलाही अजेंडा नाही़ गेल्या २५ वर्षात इतक्या निचांकी पातळीवर एखाद्या मुख्यमंत्र्यांनी प्रचार नेल्याचे आपण पाहिले नव्हते़ हे महाराष्ट्राचे दुदैव आहे़ २ -३ ग्लास पाणी पिऊन मुख्यमंत्री शिवसेनेची औकात काढत आहेत़ येत्या २३ तारखेला जनता त्यांना त्यांची औकात दाखविल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांनी सांगितले़ अशी ही बनवाबनवीकाही वर्षांपूर्वी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांचा अशी ही बनवाबनवी हा चित्रपट आला होता़ त्यात दोघांनी अफलातून अभिनय केला होता़ त्यांना या दोघांनी मागे टाकले आहे़ अशोक आणि सचिनाच्या जागी देवेंद्र फडवणीस आणि उद्धव ठाकरे यांचे आता फोटो छापावे लागतील, असा टोला विखे पाटील यांनी लगावला़भाजप आणि शिवसेनेचे हे ठरवून चालले आहे़राज ठाकरे  यांना त्यांचे  साधे नगरसेवक सांभाळता  आले नाहीमंत्र्याविरुद्ध पुरावे देऊनही मुख्यमंत्र्यांची त्यांना क्लीन चिट देण्यातच पारदर्शकता़ सिंहगडावर ५० रुपयांची पावती न फाडता जाऊन फुकट नगरसेवकाची पारदर्शकतेची शपथ घेण्याचा खुलासा करण्याची गरज़गुंडांना पावन करुन घेण्याची पुण्यातही कार्यक्रमाने पुणेकर धन्य़