शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. पवार यांचे निलंबन अखेर रद्द

By admin | Updated: September 30, 2016 02:33 IST

राज्यात गाजलेल्या कथित औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आणि इतर तिघांचे निलंबन मुख्यमंत्री देवेंद्र

- यदु जोशी, मुंबई

राज्यात गाजलेल्या कथित औषध खरेदी घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आणि इतर तिघांचे निलंबन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहे. डॉ. पवार, आरोग्य सहसंचालक डॉ. राजू जोटकर, सहायक संचालक डॉ. सचिन देसाई आणि सहायक संचालक डॉ. राधाकृष्ण पवार यांना चालू वर्षी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (एप्रिल) निलंबित केल्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यानंतर तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव (सामान्य प्रशासन) डॉ. भगवान सहाय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. समितीने या प्रकरणी अधिक चौकशी होण्याची आवश्यकता आहे, असा अहवाल दिला होता. त्यानंतर निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी यांची एकसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. २९७ कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा घोटाळा झाला नाही, निविदांमध्ये अनियमितता नव्हत्या, निविदेच्या अटी ऐनवेळी बदलल्या नाहीत, असा अहवाल चॅटर्जी समितीने दिला. मात्र, ७ कोटी २५ लाख रुपयांची जादाची खरेदी गरज नसताना करण्यात आल्याचा ठपका ठेवला. राष्ट्रीय नागरी आरोग्य योजनेंतर्गत महापालिका, नगरपालिकांकडून औषधांच्या आवश्यकतेबाबतची मागणी नीट न नोंदविल्याबद्दल डॉॅ. जोटकर (सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य योजना) यांना समितीने जबाबदार धरले. मात्र, खरेदीमध्ये आर्थिक घोटाळा झाला नाही, असे मत देताना डॉ. सतीश पवारांसह सर्वांना निर्दोष ठरविले. इतर तिघांबरोबर डॉ. जोटकर यांचे निलंबन मागे घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.तथापि, ७.२५ कोटी रुपये किमतीच्या ४७ औषधांची जादा खरेदी झालेली होती तरीही त्यातील ३ कोटी ५० लाख रुपयांची २६ औषधे गरज असलेल्या महापालिका आणि नगरपालिकांना पाठविण्यात आली आणि अन्य २१ औषधे ही आरोग्य संचालनालयाला देण्यात आली. त्यांची एक्स्पायरी डेट २०१७पर्यंतची आहे. त्यातील सहा औषधे वापरात आणली गेली असून, इतर १५ लवकरच वापरात आणली जातील, असे आरोग्य संचालनालयाने चौकशी समितीला कळविले होते, असेही सूत्रांनी सांगितले. डॉ. सतीश पवार यांचे निलंबन मुख्यमंत्र्यांनी रद्द केले असल्याने ते आता संचालकपदी लवकरच परतण्याची शक्यता आहे. चौकशी सुरू असलेल्या अधिकाऱ्याला निलंबन रद्द झाले तरी मूळ पदावर परतता येत नाही, असा शासनाचा जीआर आहे. हे कारण देऊन डॉ. पवार यांना पुन्हा त्याच पदावर परत आणण्याबाबत अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तथापि, डॉ. पवार यांच्याविरुद्ध कोणतीही चौकशी सुरू नसल्याने त्यांना संचालकपदी परतण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असे काहींचे म्हणणे आहे.