शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 5, 2015 16:55 IST

मुंबईतील इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 
नवी दिल्ली, दि. ५ -  मुंबईतील इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. इंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात येण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये करार झाला आहे. हा करार झाल्याने आता इंदू मिलमध्ये लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु होऊ शकेल. 
दादरमधील चैत्यभूमीलगतच्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. रिपब्लिकन पक्षांनी या मागणीसाठी आंदोलनंही केली होती. मात्र इंदू मिलची जागा केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यांतर्गत येत असल्याने स्मारकाच्या मार्गात अडथळे येत होते. भाजपाने सत्तेवर येताना इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. १४ एप्रिलला या कामाचे भूमीपूजन करु अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण करार झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व राष्ट्रीय वस्त्र निगम यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी करारावर स्वाक्षरी केली.  या करारानंतर आता इंदू मिलच्या १२ एकरच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधले जाणार आहे.