शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी पहिली अटक

By admin | Updated: June 11, 2016 00:11 IST

अंधश्रध्दा निर्मून समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉक्टर विरेंद्र तावडे याला संशयावरून अटक केली आहे.

ऑनलाइन  लोकमत
पुणे, दि. १० -  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ.  नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पनवेलमधील डॉ. विरेंद्र तावडेला संशयावरून अटक केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील ही पहिलीच अटक आहे. विरेंद्र तावडे हा कान-नाक-घसा तज्ज्ञ आहे. त्याचा पनवेलजवळील कळंबोली येथे दवाखाना आहे. तावडे याचे पनवेलजवळील सनातनच्या आश्रमाजवळच कल्पतरू सोसायटीमध्ये घर आहे. तो हिंदू जनजागरण समितीचा कार्यकर्ता आहे.  
 
१ जून रोजी सीबीआयने पुण्यातील सारंग अकोलकर आणि तावडे यांच्या घरावर छापे टाकले होते. पुण्याच्या सीबीआय न्यायालयातून सर्च वॉरंट मिळाल्यानंतर तावडे याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या. त्याचा लॅपटॉपही जप्त करण्यात आला होता. तसेच अकोलकर आणि तावडे या दोघांचा ई-मेलवरून संपर्क होता, असे तपासात दिसून आले होते.  छाप्यानंतर सीबीआयकडून तावडेला चौकशीसाठी बोलावण्यात येत होते.  आज चौकशीसाठी बोलावल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. शनिवारी त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआयच्या अधिका-यांनी दिली. 
 
गोव्यातील बॉम्बस्फोटप्रकरणी आधीपासूनच राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) रडारवर असलेल्या अकोलकरच्या पुण्यातील घरासह पनवेलमधील डॉ. तावडे आणि देवद आश्रमावर सीबीआयने छापे टाकून झडती घेतली होती. याच वेळी दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींची ओळख पटली असून, सनातन संस्था आणि हिंदू जनजागरण समितीनेच हत्या केल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे आशिष खेतान यांनी केला होता. 
 
दरम्यान, मुक्ता दाभोलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सीबीआयच्या अधिका-यांनी अटक केल्याची माहिती दिल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘ न्यायालयाने वेळोवेळी तपास यंत्रणांना दिलेल्या सूचनांमुळे केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. या अटकेतून या प्रकरणामागील सूत्रधार उघड होईल. हा एका मोठ्या कटाचा भाग असू शकतो. त्याचा उलगडाही यामुळे होणार आहे. 
 
 
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मारेक-यांना शोधण्यात पुणे पोलिसांना अपयश आल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने आपला तपास अधिक तीव्र करताना मागील वर्षी दोन संशयितांची रेखाचित्रे जाहीर केली होती.