मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्षानिमित्ताने त्यांच्या जीवनपटावर आधारित दुर्मीळ छायाचित्रे व कागदपत्रांचे प्रदर्शन पुराभिलेख संचालनालयातर्फे चर्चगेट येथील जयहिंद महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २२ ते २४ आॅगस्ट या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी खुले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांच्या हस्ते आज या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाडिया या वेळी उपस्थित राहणार असल्याचे संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप प्र. बसलेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
डॉ. आंबेडकरांचा दुर्मीळ दस्तऐवज आज उलगडणार
By admin | Updated: August 22, 2016 02:22 IST