शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या

By admin | Updated: August 28, 2016 19:25 IST

जादूटोणा केल्यामुळेच एक महिला व एका बालकाचा मृत्यू झाला, या संशयावरून काही लोकांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण करून खून केला.

ऑनलाइन लोकमतभंडारा, दि. 28 - जादूटोणा केल्यामुळेच एक महिला व एका बालकाचा मृत्यू झाला, या संशयावरून काही लोकांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण करून खून केला. त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह जंगलात फेकून दिले. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील दावेझरी (टोला) येथे रविवारी (२८ ला) उघडकीला आली. यादोराव नारबा ढोक (६५) व कौसल्या यादोराव ढोक (५५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणातील १६ संशयितापैकी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कुठलिही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. ४०-५० घरांची वस्ती असलेल्या दावेझरी (टोला) या गावातील घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. दावेझरीत यादोराव ढोक व त्यांची पत्नी कौसल्या ढोक राहत होते. त्यांची मुले रोजगारासाठी नागपुरात राहतात. मोलमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह होता. मागील आठवड्यात गावात एका तीन वर्षीय बालकाचा मुत्यू झाला, त्यापुर्वी एका महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांना ढोक पतीपत्नी जबाबदार आहेत, असा काही जणांचा संशय होता. गावात यादोराव ढोक हा जादुटोणा करतो, असा समज झाल्याने गावातील कुणीही या कुटूंबियांच्या संपर्कात नव्हते. एकप्रकारे या कुटूंबावर बहिष्कार घातल्याचे चित्र होते. तीन दिवसापूर्वी एका बालकांचा मृत्यू झाला. ढोक यांनी जादुटोना केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा संशय व्यक्त करीत काही जणांनी लाठी-काठ्यानी त्यांच्या घरावर हल्ला केला. शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या या हल्ल्याने यादोराव व पत्नी कौसल्या चांगलेच घाबरले. त्यांनी पळून जावून एका मंदिरात आश्रय घेतला. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांना बेदम मारहाण करीत गावातील चौकात आणण्यात आले. या चौकात लाठी व काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दोघांचेही मृतदेह ३ किमी अंतरावरील वनविभागाच्या कंपार्टमेंट ४४८ मध्ये मृत पती पत्नीचे मृतदेह बंद असलेल्या खाणीत फेकून दिले. रविवारला पतीपत्नी बेपत्ता असल्याची चर्चा गावात पसरली. त्यामुळे रविवारला सकाळी सिहोरा पोलिसांची चमू गावात दाखल झाली. या घटनेला जबाबदार असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असता. पोलिसांची वाहने अडविण्यात आले. गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली. एका संशयिताने या घटनेची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी शिवा बावणे, रविंद्र बावणे, गुड्डू नारनवरे, राकेश बागडे, विजय शेंडे, मनिष बावणे, शैलेष उईके, रामदास चौधरी, महेश पटले, परमानंद नारनवरे, अविनाश पटले यांना ताब्यात घेतले असून प्रमोद राऊत, दयाराम सोनवाने, भारत मडावी, बालू शरणागत हे संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ढोक यांची मुले नागपुरहून परतलेली नाही. दरम्यान गावात या घटनेसंदर्भात कुणीही बोलण्यासाठी तयार नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरूच होती.