शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचा दुप्पट मोबदला

By admin | Updated: May 23, 2017 04:23 IST

महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. च्या मनोऱ्यासाठी भूसंपादनाचा मोबदला रेडिरेकनर दराच्या दुप्पट दिला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापारेषणतर्फे राज्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. च्या मनोऱ्यासाठी भूसंपादनाचा मोबदला रेडिरेकनर दराच्या दुप्पट दिला जाणार आहे. तसेच, शेतावरून जाणाऱ्या वीज वाहिन्यांखालील (तारा) जमिनीसाठीही मोबदला दिला जाईल.राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या संबंधीच्या धोरणास मंजुरी देण्यात आल्याची माहिती ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आतापर्यंत मनोऱ्याखालील जागेच्या मूल्याच्या २५ ते ६५ टक्के एवढी नुकसान भरपाई जमिनीच्या प्रकारनुसार- कोरडवाहू, ओलीत, बागाईत, अकृषक जमिनीसाठी देण्यात येत होती. नवीन धोरणामुळे शेतकऱ्यांना मनोऱ्याने व्याप्त जमिनीच्या त्या-त्या भागातील रेडीरेकनर प्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. तसेच वाहिन्यांखालील जमिनीचा मोबदला ही मिळणार आहे. सध्या वाहिन्यांच्या पट्टयाखालील जमिनीचा मोबदला देण्यात येत नव्हता.नव्या धोरणानुसार तारांखालील जागेचा मोबदला दिला जाणार आहे. शहरी भागात मोबदला देण्यासाठी अतिउच्चदाब वाहिन्यांबाबत केंद्र सरकारच्या स्तरावर समिती स्थापन करण्यात आली. मुंबई महापालिका व उपनगरीय क्षेत्रातील जमिनीचे दर जास्त असल्यामुळे सुधारीत नवीन धोरण मुंबई व उपनगरे वगळून लागू राहील. अतिउच्च दाब मनोऱ्याने व्याप्त वाहिनीच्या खालील जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल. भूमि अभिलेख उपअधिक्षक व तालुका/जिल्हा कृषी अधिकारी व पारेषण कंपनीचे प्रतिनिधी या समितीचे सदस्य राहतील.सातबारा उताऱ्यावर मोबाईल मनोऱ्याची नोंद जमिनीचा मोबदला शेतकऱ्यास मान्य नसेल तर तो जिल्हाधिकाऱ्याकडे अपिल करु शकेल.दिलेल्या मोबदल्याची नोंद सातबाराच्या उताऱ्यावर केली जाईल. मोबदल्याची रक्कम समान दोन टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदला मनोरा पायाभरणीनंतर व दुसऱ्या टप्प्यातील मोबदला मनोरा उभारणीनंतर देण्यात येईल. तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. मनोरा-पायाभरणी, वाहिनी उभारताना पिकांचे व फळझाडांचे नुकसान झाल्यास दोन टप्प्यात मोबदला देण्यात येईल. ज्या जमिनीवरुन फक्त तारा गेल्या अशा ठिकाणी तारेखालील जमिनीचा मोबदला प्रत्यक्ष वाहिनी उभारल्यानंतर देण्यात येईल. जमिनीच्या मालकाचा बदल झाल्यास नवीन मालक पात्र ठरणार नाही.