शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बालसुधारगृहांचे अनुदान दुप्पट करा

By admin | Updated: April 9, 2017 04:54 IST

गतिमंद मुलांसाठी, तसेच अन्य मुलांसाठी बालसुधारगृहे चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात राज्य सरकारने या १ एप्रिलपासून दुपटीहून अधिक वाढ करावी

मुंबई : गतिमंद मुलांसाठी, तसेच अन्य मुलांसाठी बालसुधारगृहे चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना दिल्या जाणाऱ्या अनुदानात राज्य सरकारने या १ एप्रिलपासून दुपटीहून अधिक वाढ करावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.मुंबईतील मानखुर्द येथील बालसुधारगृहातील दयनीय अवस्थेसंबंधी वृत्तपत्रांतील बातम्यांची स्वत:हून दखल घेऊन, सुनावणीसाठी घेतलेल्या जनहित याचिकेवर न्या. अभय ओक व न्या. अमजद सैयद यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. गतिमंद मुलांच्या बालसुधारगृहांसाठी सरकार प्रत्येकी दरमहा १,१४० रुपये अनुदान देते. यापैकी ८२५ रुपये मुलांच्या खर्चासाठी, तर ३१५ रुपये प्रशासकीय खर्चासाठी दिले जातात. त्याऐवजी प्रत्येकी दरमहा दोन हजार तर प्रशासकीय खर्चासाठी ५०० रुपये द्यावेत, असे न्यायालयाने सांगितले.कायद्यानुसार बालसुधारगृहे स्वत: वा स्वयंसेवी संस्थांकडून ती चालविणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकारी अनुदान तुटपुंजे आहे व तेवढ्या पैशात ती चालविणे अशक्य आहे. तुटपुंजे अनुदान देऊन सरकार कर्तव्यात कसूर करीत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. बालसुधारगृहांची कामे सुरळीत चालावीत, यासाठी न्यायालयाने राज्य समन्वय समिती स्थापन केली. या समितीच्या सल्ल्याने सरकारने सुधारगृहांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय तीन महिन्यांत घ्यावा व तोपर्यंत या वाढीव दराने अनुदान द्यावे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले. बालसुधारगृहाला आयत्या वेळी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चासाठी पाच हजार रुपयांचा आपत्कालीन निधी उपलब्ध करावा, असेही न्यायालयाने सांगितले. (विशेष प्रतिनिधी)त्रुटी दूर करण्यासाठीही दिलेले निर्देश लोकवर्गणीतून बालकल्याण निधीची तीन महिन्यांत निरामय आरोग्यविमा योजनावर्षातून किमान दोनदा वैद्यकीय तपासणीसर्व मुलांचा सर्व शिक्षा अभियानात समावेशसर्व जिल्ह्यांत बालकल्याण समित्यापुनर्वसनासाठी ‘चुनौती’ मॉडेलराज्यात गतिमंद मुलांसाठी २७ बालसुधारगृहे स्वयंसेवी संस्थांतर्फे चालविली जातात. एकूण १,८६५मुलांचा सांभाळ करण्याची त्यांची क्षमता आहे. सहा सुधारगृहे मुलींसाठी, सात फक्त मुलांसाठी व बाकीची मुले व मुलींसाठी एकत्रित चालविली जातात.अन्य बालसुधारगृहांसाठी प्रत्येक मुलामागे दरमहा १,५०० रुपये व प्रशासकीय खर्चासाठी दरमहा ५०० रुपये अनुदान देण्यास न्यायालयाने सांगितले. ८० टक्के रक्कम आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आगाऊ देण्याचेही निर्देश दिले.