शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरला दुहेरी मुकुट

By admin | Updated: December 16, 2014 00:21 IST

राज्य व्हॉलिबॉल स्पर्धा : पुरुष-महिला गटांत बाजी; मुंबई उपनगर, पुणे उपविजेता

कुरुंदवाड : येथील श्री स्पोर्टस् क्रीडा संस्थेने आयोजित केलेल्या ४६व्या राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेत पुरुष-महिला गटांत नागपूरच्या संघांनी दुहेरी मुकुट पटकावत अजिंक्यपदावर नाव कोरले. पुरुष गटात मुंबई उपनगर संघ, तर महिला गटात पुणे संघ उपविजेता ठरला. पुरुष गटानेही जिगरबाज खेळी करीत मुंबई उपनगराला २५-२०, २३-२५, २५-१९, २८-३० व १५-९ अशा सेटनी तीन विरुद्ध २ गुणांनी पराभूत केले. पहिला सेट नागपूर संघाने २५-२० अशा फरकाने जिंकला, तर दुसरा सेट मुंबई संघाने २५-२३ असा जिंकून गुणात बरोबरी साधली. नागपूर संघाने सौरभ लोकरे, नीलेश मते, एस. सहदेव. पी. बाला टंडन व जे. तिवारी यांच्या उत्कृष्ट खेळीने नंतरचे दोन्ही सेट अत्यंत चिकाटीने जिंकले, तर मुबंई उपनगरच्या कल्पेश पटेल, दिग्विजय पानसरे, दिग्विजय साळुंखे, अंकित चौधरी, जी. भडंगे यांनीही तितक्याच जोराने प्रत्युत्तर दिले. मात्र, नागपूरच्या सांघिक खेळीपुढे मुंबई उपनगरला हार पत्करावी लागली. या अटीतटीच्या लढतीमुळे तब्बल अडीच तासांहून अधिक काळ सामना रंगला. या रंगलेल्या सामन्यामुळे मध्यरात्रीपर्यंतही स्टेडियममधील एकाही क्रीडाशौकिनाने जागा सोडली नाही. पुरुष गटात गतविजेत्या पुणे संघास तिसरे स्थान मिळाले. महिला गटातील अंतिम लढतीतही नागपूर विरुद्ध पुणे यांच्या झालेल्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत नागपूर संघाने पुणे संघावर २०-२५, २५-१८, २५-१८ व २७-२५ अशा सेटने मात करीत विजय मिळविला. दोन्ही संघांनी प्रत्येक गुणासाठी पाठलाग केल्याने चार सेटवर तब्बल सव्वादोन तास सामना रंगला.पुणे संघाच्या अनिता झाकरीस व अमिता झाकरीस या जुळ्या बहिणींनी सरस कामगिरी केली. त्यांना स्नेहा भगत, प्रियंका धोत्रे, प्रियदर्शनी कोकरे यांनी चांगली साथ दिली. मात्र, नागपूर संघाची नामांकित खेळाडू भाग्यश्री धार्मिक, लिफ्टर दिशा देवाळकर, सिमरन चौधरी यांच्या उत्कृष्ट सांघिक खेळापुढे पुणे संघाला नामोहरम व्हावे लागले. पुणे संघाने पहिला सेट २५-२० फरकाने जिंकला. मात्र, नागपूर संघाने चिवट खेळी करीत सलग तीनही सेट जिंकत विजेतेपद पटकाविले. सांगली संघास तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजयानंतर नागपूरच्या पुरुष व मुलींच्या संघांनी डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष केला. यावेळी सामना संयोजन समितीने केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने मध्यरात्री शहर उजळून निघाले. या रोमहर्षक लढतींमुळे रविवारच्या मध्यरात्री कुरुंदवाड शहर व परिसरातील क्रीडाशौकीनांनी संपूर्ण मैदान फूलून गेले होते. विजेत्या संघांना माजी मंत्री सतेज पाटील, नगराध्यक्ष संजय खोत, मयूर दूध संघाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी श्री स्पोर्टस् अध्यक्ष जयराम पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र डांगे, सचिव बी. डी. सावगावे, प्राचार्य डॉ. सुनील चव्हाण, नगराध्यक्ष संजय खोत, बांधकाम सभापती वैभव उगळे, उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे, राज्य व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव बाबासाहेब सूर्यवंशी, प्रा. शरद पराडकर यांच्यासह श्री स्पोर्टस्चे पदाधिकारी, नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)कुरुंदवाड येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेतील राज्य अजिंक्यपद विजेतेपदाचे बक्षीस माजी मंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते स्वीकारताना नागपूर संघाचे खेळाडू.