शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत सामूहिक बलात्कार

By admin | Updated: August 1, 2016 04:30 IST

फेसबुकवरून ओळख वाढवून तिला लग्नास भाग पाडल्याचे आणि नंतर काका, चुलत दीर व पतीने सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण डोंबिवलीत उघडकीस आले

डोंबिवली : उत्तर प्रदेशातील तरुणीशी फेसबुकवरून ओळख वाढवून तिला लग्नास भाग पाडल्याचे आणि नंतर काका, चुलत दीर व पतीने सामूहिक बलात्कार केल्याचे प्रकरण डोंबिवलीत उघडकीस आले आहे. याव्यतिरिक्त माहेरहून पैसे आणण्यासाठी तिचा छळ करण्यात आला अणि तिला वेश्याव्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. तिने पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. काका, काकी आणि चुलत दीर पसार झाले असून, त्यांचा शोध सुरू आहे. नालासोपाऱ्याचा रहिवासी असलेल्या कान्हा ठाकूर उर्फ राहुल गुलाब सिंग या तरुणाने फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीशी ओळख वाढवली. ही तरुणी उत्तर प्रदेशात राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर टाकून तिची बदनामी करण्याची धमकी दिली. त्याला ती तरुणी दाद देत नसल्याने राहुलने आत्महत्या करण्याची धमकी देत तिच्यावर विवाहासाठी दडपण आणले. आत्महत्येच्या धमकीनंतर घाबरून त्या तरुणीने त्याच्याशी विवाह केला. विवाहानंतर राहुलने तिला डोंबिवलीत काकाच्या घरी आणले. तोही तेथेच राहू लागला. राहुलचा काका रमेश सिंग आणि चुलत दीर राजेश सिंग यानेही तिच्यावर बलात्कार केला. याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्याबाबत, तक्रार केल्यावर पती राहुल आणि काकी अनिता यांनी दुर्लक्ष केले. या कृत्याला त्यांचीही मूकसंमती होती. त्यांनी तिच्या बाजूने कोणताही आवाज उठवला नाही. त्यांनी तिला दोषी ठरवून काका आणि चुलत दिराची बाजू घेतली. हा प्रकार घडत असताना पतीनेही तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. तर, घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तोंडावर अ‍ॅसिड टाकून विद्रूप करण्याची धमकी काकीने दिली. या कृत्यानंतर चौघांनी मिळून तिच्याकडे घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. त्यासाठी तिचा छळ सुरू झाला. नंतर, तिला वेश्याव्यवसायात लोटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत पती, काका, काकी आणि चुलत दिराविरुद्ध तक्रार दाखल केली. ती दाखल होताच पोलिसांनी पती राहुल गुलाब सिंग याला अटक केली. पतीसोबतच काका, चुलत दीर आणि काकीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काका, काकी आणि चुलत दिराने पळ काढला आहे. पोलीस तिघांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)