शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत प्लास्टिकची चिनी अंडी

By admin | Updated: April 6, 2017 03:30 IST

चिनी बनावटीची प्लास्टिकचे आवरण असलेली अंडी विकली जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

डोंबिवली : कोलकाता आणि चेन्नई येथे चिनी बनावटीच्या प्लास्टिकच्या नकली अंड्यांची विक्री केली जात असल्याचे अलीकडेच उघडकीस झाले असतानाच आता डोंबिवलीमध्येही तशीच चिनी बनावटीची प्लास्टिकचे आवरण असलेली अंडी विकली जात असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी येथील पंचऋषी संकुलातील वसिष्ठ बिल्डिंगमध्ये राहणारे शिक्षक अमेय गोखले यांनी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास अनंत निवास इमारतीच्या खालील संदेश पानबिडी शॉपमधून अर्धा डझन अंडी विकत घेतली. त्यातील दोन अंड्यांचे गोखले यांनी आमलेट केला असता उग्र वास येऊ लागला. त्यांनी आमलेट खाण्याचा प्रयत्न केला, तर ते च्युइंगमसारखे वातड लागल्याने गोखले यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी अंड्याचे कवच नीट निरखून पाहिले असता त्यांना ते प्लास्टिकचे असल्याचे दिसून आले. खातरजमा करण्याकरिता त्यांनी दुसरे अंडे फोडले असता त्यातही त्यांना प्लास्टिकचे आवरण आढळले. अंड्यातील बलक व पांढरा भाग तव्यावर टाकल्यावर वातड होत असल्याचे दिसले. त्यांनी ती अंडी तशीच ठेवली. रात्र झाल्याने ज्या दुकानातून अंडी खरेदी केली होती, ते दुकान बंद झाले होते. काही दिवसांपूर्वी कोलकाता आणि चेन्नई येथे चिनी बनावटीची प्लास्टिकची नकली अंडी विक्रीस आल्याची बातमी यू ट्यूबवर पाहिल्याची आठवण गोखले यांना झाली. गोखले यांनी ही अंडी बुधवारी पत्रकारांना दाखवली. याबाबत, आपण पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणार असल्याचे गोखले यांनी सांगितले.याबाबत, संदेश पानबिडी दुकानाचे मालक एस.बी. शेट्टी यांना विचारले असता ते म्हणाले की, इतर कोणाची अंड्यांबाबत तक्रार आलेली नाही. आपल्या दुकानातून दररोज १०० ते १२५ अंडी विकली जातात. अंड्यांबाबत तक्रार असल्याचे गोखले यांनी सायंकाळी सांगितले. आता अंड्यांच्या होलसेल पुरवठादाराकडे आपण तक्रार करणार आहोत. (प्रतिनिधी)>डोंबिवलीतील शिक्षक अमेय गोखले यांनी मंगळवारी रात्री आणलेली अंडी प्लास्टिकची असल्याचे लक्षात आल्यावर त्यातील वातड अंश त्यांनी सर्वांना दाखविला. याबाबत कारवाई होण्याची गरज असल्याचे ते वारंवार सांगत होते.डोंबिवलीतीलअंड्यातील कवचासोबतचा भाग प्लास्टिकचा असल्याचे निष्पन्न झाले. ती अंडी आणि त्यावरील आवरण.