शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

डास व अळ्यांची तपासणी पुण्याची चमू करणार

By admin | Updated: September 19, 2014 00:51 IST

जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. यातील एक मृत्यू या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र इतर मृत्यू नेमके कशाने झाले, याची शहानिशा

वर्धेत डेंग्यूचे १०२ रुग्ण : आतापर्यंत ११७६ रक्त नमुन्यांची तपासणीरूपेश खैरी - वर्धाजिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून आतापर्यंत सहा जणांचा बळी घेतला आहे. यातील एक मृत्यू या आजाराने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र इतर मृत्यू नेमके कशाने झाले, याची शहानिशा न झाल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. वरवर डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसत असली तरी इतर वेगळी लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येत असल्याची बाब निष्पन्न झाली आहे. हा आजार नेमका कोणता याचा शोध घेण्यासाठी खुद्द पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेची चमू शुक्रवार दि. १९ रोजी वर्धेत येणार आहे. ही चमू डास व डास अळीसह रुग्णांचे रक्तनमुने घेणार आहे. गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश आजाराचा प्रकोप आहे. बुधवारपर्यंत तब्बल एक हजार १७६ रक्तनमुने तपासण्यात आले. यापैकी १०२ जणांना डेंग्यूची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र डेंग्यूचा उपचार करुनही ते रुग्ण बरे होत नसल्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे. सदर बाबीची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने वरिष्ठांपर्यंत पोहोचविली आहे. याची गंभीर दखल घेत पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेची चमू वर्धेत दाखल होणार आहे. ही चमू केवळ वर्धेतच नाही तर विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही जाणार आहे. दरम्यान, डास व डासअळी तसेच डेंग्यूच्या रुग्णांचे रक्तनमुने संकलित करणार आहे. यापूर्वी भंडारा येथे या प्रकारची तपासणी करण्यात आली आहे. त्या सर्व नमुन्यांवर पुणे येथे राष्ट्रीय विषाणू संस्थेत अभ्यास केला जाणार आहे. डासांची वाढलेली शक्ती व त्यांच्यापासून लागण झालेल्या रोगावर प्रभावी औषधोपचार काय असू शकेल, या अनुषंगाने पावले उचलली जाणार आहेत. रुग्णांमध्ये आढळत असलेल्या इतर लक्षणांचा देखील ही चमू अभ्यास करणार आहे.