शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

उद्योग-व्यवसाय करणे हे आव्हानात्मकच!

By मनोज गडनीस | Updated: October 14, 2024 11:51 IST

अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी -अलीकडच्या काळात देशात उद्योजकता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागत आहे, अशी चर्चा सातत्याने कानावर पडत होती. मात्र, केंद्र सरकारच्या लेबर फोर्स सर्वेक्षणातून याची नेमकी आकडेवारी पुढे आली आहे आणि ही आकडेवारी या चर्चेला पुष्टी देत आहे. या आकडेवारीनुसार देशातील तरुणांपैकी ४८ टक्के लोक हे नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय करण्यास प्राधान्य देत आहे. सरकारने लागू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत किंवा अन्य मार्गे पण स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहे. या आकडेवारीच्या निमित्ताने काही तरुणांशी चर्चा केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करणे ही आपली जिद्द आणि आवड असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्याचसोबत व्यवसाय करणे ही किती आव्हानात्मक आहे, याचीही जाणीव त्यांनी करून दिली.अलीकडेच पनवेलनजीक एका उद्योजकाने पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करत कृषिपूरक व प्रक्रिया प्रकल्प विकसित केला होता. अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असा हा प्रकल्प होता. या प्रकल्पामध्ये संबंधित उद्योजकाने १०० टक्के स्थानिकांना रोजगार दिला होता. मात्र केवळ रोजगार देऊन भागले नाही तर स्थानिक समाजकंटकांचा त्रासदेखील होऊ लागला. त्यातच सणासुदीच्या महत्त्वाच्या काळात ज्यावेळी अधिक श्रमाची गरज होती त्यावेळी बहुतांश स्थानिक कामगारांनी आम्हाला सणासुदीच्या काळात काम करता येणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी जेव्हा या उद्योजकाने बाहेरून कामगार आणले त्यावेळी स्थानिक समाजकंटकांनी त्या बाहेरच्या कामगारांना मारहाण करत प्रकल्प बंद पडण्याचा जणू चंगच बांधला. अखेरीस जेरीस येऊन संबंधित उद्योजकाने आपला प्रकल्पच तेथून गुंडाळला. यामध्ये उद्योजकाचे जेवढे नुकसान झाले तसेच स्थानिकांचा रोजगार बुडाल्यामुळे त्यांचेही झाले. मात्र, प्रश्नांना कोण आणि कसा पायबंद घालणार? या मुद्द्यांवरही भाष्य होणे गरजेचे आहे. अन्य एका उद्योजकाने सांगितले की, व्यवसायात ज्याला कम्प्लायन्स म्हणतात, अशा विविध गोष्टींची पूर्तता ऑनलाइन करण्याची सुविधा सरकारने आता उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यातही अनेकवेळा वेबसाइट बंद असणे, वेबसाइटवर मंजुरीसाठी अपलोड केलेली फाईल पुढेच न सरकवणे, ती फाईल पुढे सरकवायची असेल तर त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणे हे करावेच लागते. ऑनलाइन प्रणाली असूनही लोकांना सरकारी कार्यालयात का जावे लागते?, याचा ‘अर्थ’ काय?, यावरही बोलणे गरजेचे आहे. जीएसटी व अन्य कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्यावर्षी टार्गेट पूर्ण करायचे म्हणून अनेक उद्योजकांच्या कार्यालयांवर नोटिसांचा पाऊस पाडला. उद्योजकता निर्माण करण्यासाठी सरकार कितीही योजना सादर करो, पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिथे होते तिथली परिस्थिती मात्र उद्योजकाच्या संयमाचा अंत पाहणारीच आहे.

टॅग्स :businessव्यवसायGovernmentसरकारCentral Governmentकेंद्र सरकार