शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

मेडिकल प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास वेबसाईटचा खोडा

By admin | Updated: June 16, 2014 20:00 IST

२१ जून अंतिम कालावधी असताना अर्ज भरण्यास अडचणी

अकोला : राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे; मात्र सदर वेबसाईट योग्य प्रकारे प्रतिसाद देत नसल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अडचणी येत असून, दिलेल्या मुदतीत हे अर्ज सादर होण्याची शक्यता कमी दिसून येत आहे.पीएमटी दिलेल्या विद्यार्थ्यांना खासगी वैद्यकीय महाविद्यालयात सरकारी कोट्यातून ५० टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागत आहेत. तर उर्वरित ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश महाविद्यालय स्तरावर मॅनेजमेंट कोट्यातून देण्यात येणार आहेत. सरकारी कोट्यातील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना १५ ते २१ जून हा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी प्रशासनाकडून एक वेबसाईट देण्यात आली असून, यावर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरताना महाविद्यालयाचा पसंतीक्रम देणे बंधनकारक असून, यासाठी महाविद्यालयाचे कोड या अर्जात नमूद करणे आवश्यक आहे; मात्र सदर वेबसाईटवर महाविद्यालयाचा कोड व पसंतीक्रम देण्यासाठी असलेली महाविद्यालयाची यादी उघडत नसल्याने विद्यार्थ्यांना हा अर्ज भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महाविद्यालयाचे कट ऑफ मार्क्सही या ठिकाणी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अर्ज सादर होत नसल्याने त्यांना या प्रवेशापासून वंचित ठेवण्याचा डाव आखण्यात आल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर पुरेपूर माहिती मिळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना हे अर्ज भरण्यापासून वंचित राहावे लागणार असल्याचा आरोपही त्यांच्या पालकांनी केला आहे.