शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुलुंडमध्ये डॉक्टरचा मुलीवर बलात्कार

By admin | Updated: September 7, 2014 02:58 IST

पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनेच डॉक्टरकडे जाणो मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलेच महाग पडले. डॉक्टरने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले.

अज्ञानाचा घेतला गैरफायदा : तपासणीच्या निमित्ताने काढले ईल फोटो
मुंबई : पोटदुखीची तक्रार घेऊन एकटीनेच डॉक्टरकडे जाणो मुलुंडमधील 17 वर्षीय मुलीला चांगलेच महाग पडले. डॉक्टरने मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिचे नग्न फोटो काढले. ते सोशल मीडियावर जाहीर करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. डॉ. जयेश खतिरा (48) असे या नराधम डॉक्टरचे नाव असून, मुलुंड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुलुंड कॉलनीत डॉ. खतिरा याचा ‘आकांक्षा नर्सिग होम’ नावाचा दुमजली दवाखाना आहे. तो बीएचएमएस असून गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. 1 सप्टेंबरला पोटदुखीची तक्रार घेऊन एक अल्पवयीन मुलगी त्याच्याकडे आली. ती एकटीच आहे ही संधी साधत तपासणी करण्याच्या बहाण्याने खतिराने तिला कपडे काढण्यास सांगितले. नंतर तपासणीच्या बहाण्याने त्याने तिचे मोबाइलमध्ये फोटो काढले. लगेच त्याने हे फोटो तिला दाखवून ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. भेटायला ये, नाहीतर फोटो व्हॉट्सअॅप, फेसबुकवर अपलोड करेन, अशी धमकी देऊ लागला. 
भेदरलेल्या मुलीने हा प्रकार मैत्रिणीला सांगितला. मात्र शुक्रवारी दुपारी 12 वाजता पुन्हा नराधम डॉक्टरने फोन करून दुपारी साडेतीन वाजता स्वप्ननगरी येथेल जैन मंदिराजवळ भेटण्यासाठी न आल्यास फोटो फेसबुक व व्हॉट्सअॅपवर टाकण्याची धमकी देत ही अखेरची संधी असल्याचे सांगितले. यामुळे घाबरलेली मुलगी घरामध्ये काहीही न सांगता रिक्षा पकडून जैन मंदिराजवळ गेली. खतिरा याने तिला आपल्या कारमध्ये बसवून ठाणो जिल्ह्यातील कापूरबावडी परिसरात असलेल्या टिकुजीनी वाडी परिसराकडील जंगलात नेले. तेथील रस्त्याकडेला कार उभी करून कारच्या मागच्या सीटवरच तिच्यावर बलात्कार केला. तसेच तोंड उघडल्यास फोटो जाहीर करेन, अशी धमकीही 
दिली. घरी परतल्यानंतर मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती कुटूंबियांनी मुलीला सोबत घेवून कापुरबावडी पोलीस ठाणो गाठले. तेथे खतिराविरोधात तक्रार दिली.  (प्रतिनिधी)
 
पाश्र्वभूमीबाबत कसून चौकशी
डॉ. खतिरा याने याआधी असे गुन्हे केले असावेत, असा दाट संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. त्याचा मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यात अन्य मुलींचे फोटो आहेत का, हेही तपासले जात आहे. शिवाय परिसरातही त्याच्या चारित्र्याविषयी चौकशी होणार असल्याचे समजते.