शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप

By admin | Updated: May 17, 2016 06:02 IST

कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

कऱ्हाड : कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. डॉ. महेश शामराव पवार (वय ३८, मूळ रा. पाल, ता. कऱ्हाड, सध्या रा. तारळे, ता. पाटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पाल येथील डॉ. महेश पवार याचा दि. ३ जून २००५ रोजी कुमठे येथील राजश्री यांच्याशी विवाह झाला. राजश्री यासुद्धा डॉक्टर होत्या. विवाहानंतर पाटण तालुक्यातील तारळे येथे दोघांनी स्वतंत्र रुग्णालये सुरू केली. त्यावेळी हे दाम्पत्य त्याचठिकाणी राहण्यास होते. लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु झाला. अशातच दि. २० नोव्हेंबर २००७ रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास डॉ. राजश्री यांना कऱ्हाडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्या जखमी झाल्याचे सांगण्यातआले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. डॉ. राजश्री यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले. त्याबाबत मृत राजश्री यांचे वडील अर्जुन सावंत (रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिस ठाण्यात डॉ. महेश पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. के. पाटील यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्या. एम. आर. देशपांडे यांनी डॉ. महेश पवारला जन्मठेप, तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)