शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ पडणार नसल्याची हमी देता का ?

By admin | Updated: March 17, 2017 23:38 IST

मुश्रीफ यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल : शेतकऱ्यांची दिशाभूल बंद करा

कोल्हापूर : राज्यात दुष्काळ पडणार नाही, गारपीट-अतिवृष्टी होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत असतील, तर आत्महत्या करणार नसल्याची हमी शेतकरी देण्यास तयार आहेत. सावकारांची कर्जमाफी करणाऱ्यांना शेतकऱ्यांची दु:खे दिसत नाहीत, बालिश वक्तव्ये करून मुख्यमंत्र्यांनी दिशाभूल बंद करावी, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला. कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री विरोधक देणार का? या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत मुश्रीफ यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. एकूण पीक कर्जापैकी ८५ टक्केवाटप जिल्हा मध्यवर्ती बॅँका करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची थकबाकी ही जिल्हा बॅँकेतच राहणार आहे. त्यामुळे अडचणीतील बॅँका वाचविण्यासाठी विरोधक कर्जमाफीची मागणी करीत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा आरोप चुकीचा आहे. खासगी सावकारांना हातभार लावणारे सरकार सहकारी बॅँकांबाबत दुजाभाव करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील निवडणुकीत कर्जमाफीची ग्वाही दिली. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तुम्हाला अडीच वर्षांपूर्वीच पाठबळ दिले. त्यांच्याकडून आत्महत्या करणार नसल्याची खात्री का मागता? शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची खात्री मागणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री असतील. अशी हमी मागणाऱ्यांनी पहिल्यांदा दुष्काळाची हमी द्यावी, असेही मुश्रीफ म्हणाले.कर्जमाफीच द्यायची नसेल तर बदनामी तरी करू नकाराज्य सरकारला शेतकऱ्यांना कर्जमाफीच द्यायची नाही. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मुख्यमंत्री असे वक्तव्य करीत आहेत. कर्जमाफी द्यायची नसली तरी किमान सहकाराला बदनाम तरी करू नये, असे आवाहन आमदार मुश्रीफ यांनी केले.