शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

दंगलीच्या राजकारणाऐवजी समाजकारण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2016 02:26 IST

कोपर्डी व तळेगाव घटनेतील आरोपी कोणत्याही समाजाचे असले, तरी त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी़ तळेगावमधील पीडित मुलगी व दंगलीतील जखमींच्या

नाशिक : कोपर्डी व तळेगाव घटनेतील आरोपी कोणत्याही समाजाचे असले, तरी त्यांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी़ तळेगावमधील पीडित मुलगी व दंगलीतील जखमींच्या आर्थिक मदतीसाठी प्रयत्न केले जातील़ कोपर्डीच्या घटनेनंतर दोन्ही समाजात संघर्ष झाला नाही. मात्र, तळेगावच्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला़ या घटनेचे राजकारण कोणी करीत असेल, तर त्यांनी राजकारणाऐवजी समाजकारण करावे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले़आठवले म्हणाले, ‘तळेगाव घटनेनंतर ऐक्याचे प्रतीक असलेल्या नाशिक जिल्ह्यात दोन समाजांमध्ये फूट पडली आहे़ दंगलप्रकरणी पोलिसांनी दोन्ही समाजांतील १३१ आरोपींना अटक केली असून, त्यापैकी ५३ आरोपींनी केलेल्या हल्ल्यात एका समाजातील ९ जण जखमी झाले आहेत़ हल्लेखोरांवर अ‍ॅट्रॉसिटीचे आठ गुन्हे दाखल केले आहेत़’ ‘मराठा आरक्षण हे केवळ संविधानाच्या माध्यमातूनच देता येणे शक्य आहे. मात्र, त्यासाठी घटनेत बदल करावा लागणार असून, त्यास आमची तयारी आहे़ तामिळनाडू राज्याप्रमाणे आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करावी, त्यातील एस़सी, एस़टी़ ओबीसी यांचे ५० टक्के आरक्षण वगळून उर्वरित २५ टक्के आरक्षण हे मराठा समाज (१६ टक्के) व इतर अल्पसंख्यांकांना (९ टक्के) दिले जावे,’ असेही त्यांनी सांगितले. भाजपा-आरपीआय युती कायमभाजपा-शिवसेनेने एकमेकांवर कुरघोडी न करता, आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढवाव्यात व आरपीआयला सोबत घ्यावे़ काही कारणाने सेना-भाजपाची युती झाली नाही, तरी भाजपा-आरपीआय युती कायम राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच महामंडळांवरील नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करणार असून, त्यामध्ये आरपीआयला स्थान देण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गुन्हेगार नगरसेवकाला भेटलेआठवले यांनी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तळेगाव येथील पीडित मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली़, तसेच दंगलीमध्ये जखमी झालेल्या नागरिकांचीही विचारपूस केली. मात्र, त्यांनी अनेक गुन्हे दाखल असलेला नगरसेवक पवन पवारची घेतलेली रुग्णालयातील भेट चर्चेचा विषय ठरली. पोलीस कर्मचाऱ्याच्या खुनातील संशयित, डझनभर गुन्हे दाखल असलेला, दंगलीमध्ये चिथावणी, तसेच घरात अवैध शस्त्रास्त्र बाळगून पोलिसांवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी पवारवर गुन्हे नोंदवले आहेत. शिर्डी ऐक्य परिषद लांबणीवरमराठा समाजाच्या मोर्चाला ‘मराठा शांती मोर्चा’असे नाव असायला हवे होते़ कोपर्डी व तळेगाव प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वातावरणामुळे शिर्डीतील ऐक्य परिषद लांबणीवर टाकावी लागल्याचे आठवले म्हणाले.