शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरासाठी आता दिल्ली, नागपूर दिसत नाही का?

By admin | Updated: November 10, 2014 04:18 IST

उसाच्या दराबाबत निर्णय होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे नेते बारामतीत आंदोलन करीत असत. यावर्षी मात्र उसाच्या दरासंदर्भात ते मवाळ बनले आहेत.

श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : उसाच्या दराबाबत निर्णय होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे नेते बारामतीत आंदोलन करीत असत. यावर्षी मात्र उसाच्या दरासंदर्भात ते मवाळ बनले आहेत. आता संघटनावाल्यांना नागपूर, दिल्ली दिसत नाही का, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पवारांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, यंदा उसाच्या भावावर ‘स्वाभिमानी’वाल्यांनी तोंड उघडले नाही. दरवर्षी ऊस तोडणी मजुरांच्या आंदोलनास जे खतपाणी घालत होते, तेच आता सत्तेत बसले आहेत, आणि शांत देखील आहेत. शिवाय ज्याचा उसाशी कोणताही संबंध अशा नेत्याला पुढे करण्याचा प्रयत्न एका संघटनेने सुरू केला, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.राज्यात त्रिशंकू स्थिती आहे. नि:स्वार्थ भावनेतून नवीन सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एलबीटी, टोल बंदी, शेतीमालाला चांगले भाव, उसाचा एमआरपीनुसार भाव देण्यासाठी भाजपा सरकारला काही महिने मोकळेपणाने काम करू दिले पाहिजे. आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)