शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचा वाटेकरी व्हायची इच्छा नाही - राणे

By admin | Updated: July 21, 2014 16:11 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २१-  लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही काँग्रेसने महाराष्ट्रात अपेक्षीत उपाययोजना केलेल्या नसल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होण्याची चिन्हे आहेत. या पराभवाचा वाटेकरी होण्याच माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला अशी कारणमीमांसा नारायण राणे यांनी केली आहे. सध्या फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले आहे. 
सोमवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'ना'राजी नाम्याची कारणे दिले. काँग्रेसने सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले. पण नऊ वर्ष वाट बघूनही मला मुख्यमंत्रीपद दिले नाही. माझ्यासोबत आलेल्यांना पक्षाने न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. 
लोकसभेतील पराभवानंतर राज्यात काँग्रेसने काही पावले उचलायला हवी होती. आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपाययोजना राबवणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तसे झालेले नाही असे राणेंनी सांगितले. जनतेसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले जात नाही, निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीत दोष असून त्यांचा प्रशासनावर वचक नाही अशा आरोपांच्या फैरीच त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दिशेने झाडल्या. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय नाही. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीतील या पराभवाच्या सामूहिक जबाबदारीतील घटक होण्याची इच्छा नसल्याने मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले. 
आज संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांनी माझा राजीनामा स्वीकारल्यानंतर पुढील भूमिका स्पष्ट करीन असे राणेंनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याविषयी सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे राणेंना सांगितले आहे. भविष्यातील राजकीय वाटचालीविषयी विचारले असता राणे म्हणाले,  मी भाजप किंवा अन्य कोणत्याही पक्षात जाण्याचा अथवा नवीन पक्ष काढण्याचा निर्णय सध्या तरी घेतलेला नाही.