शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना तुमचे घरगडी समजू नका

By admin | Updated: November 2, 2015 02:55 IST

पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्याच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे

मुंबई : पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी राज्याच्या पोलीस दलाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गैरवर्तन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. उपायुक्त व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी कार्यालय व निवासस्थानी ड्युटीवर असलेले पोलीस तुमचे घरगडी नाहीत, त्यांना सन्मानाची वागणूक द्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा सज्जड दमच त्यांनी भरला आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या तुच्छ वागणुकीबाबत पोलीस महासंचालकांकडे अनेक कर्मचाऱ्यांनी निनावी तक्रारी केल्या आहेत. कार्यालयीन कामा व्यतिरिक्त अधिकारी, त्यांची पत्नी व कुटुंबीयांकडून सर्रास अन्य कामे करण्यास सांगितले जाते. त्या पार्श्वभूमीवर महासंचालक दीक्षित यांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त/अधीक्षक व अन्य घटकप्रमुखांसाठी एक परिपत्रकच जारी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास आयुक्त/अधीक्षकांनी तातडीने त्या दरबार घेऊन सोडवाव्यात. या तक्रारींचे निवारण न झाल्यास कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)पोलीस उपायुक्त / अधीक्षक व त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी कामाच्या ठिकाणी एक मदतनीस (आॅर्डली), आॅपरेटर, तसेच निवासस्थानी दोन शिफ्टमध्ये प्रत्येक एक कर्मचारी दिला जातो. काही वरिष्ठ आणि महत्त्वाच्या पोस्टिंगवर असलेले अधिकारी घरी काम करण्यासाठी ३-४ कर्मचाऱ्यांना ड्युटी लावतात. जिल्ह्याच्या ठिकाणी काही प्रभारी अधिकारी त्यांना अधिकार नसतानाही गैरप्रकारे घरातील कामासाठी कर्मचारी ठेवत असल्याचे उघड झाले आहे.नाशिकमधून जास्त तक्रारी : अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत सर्वाधिक तक्रारी नाशिक आयुक्तालयांतर्गंत आल्या आहेत. कर्मचाऱ्यांना अत्यंत तुच्छतेची वागणूक देण्याबरोबरच वैयक्तिक कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचे महासंचालकांनी परिपत्रकात नमूद केले आहे.