शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडावर ‘हक्क’ सांगू नये

By admin | Updated: September 30, 2016 02:15 IST

भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची

अहमदनगर : भगवानगडावरुन यापुढे राजकीय भाष्य होणार नाही हे आपण गत डिसेंबरलाच जाहीर केलेले आहे. राजकीय भाष्यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची निर्मिती केली आहे. त्यामुळे कुणीही भगवानगडासारख्या धार्मिक स्थळांवर राजकीय वारसा हक्क सांगू नये. हा गड भाविकांचा होता तो भाविकांचाच राहू द्या, असे आवाहन गडाचे महंत ह.भ. प. डॉ. नामदेव शास्त्री सानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले. ‘भगवान गड कुणाचा?’ असे भाष्य आज ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते. यासंदर्भात नामदेव शास्त्री यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या भगवानगडावरील दसरा मेळाव्याला गडाच्या ट्रस्टींनी विरोध केल्याने त्याचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र, यात काहीही राजकारण नाही अथवा कुणीही नेता यापाठीमागे नाही. पंकजा मुंडे यांनी गतवर्षी गोपीनाथ गड काढला. त्या गडाच्या उद्घाटन समारंभातच ‘भगवानगड हा यापुढे केवळ भक्तीचा गड राहील तर राजकारण गोपीनाथ गडावरुन चालेल’, असे आपण जाहीर केले होते. त्यानंतर जानेवारीत भगवानगडावरील पुण्यतिथी कार्यक्रमातही ‘भगवानगडावर यापुढे किर्तनकारांशिवाय कुणीही बोलणार नाही’,हे स्पष्ट केले आहे. सर्व समाजाने त्यावेळी या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. पंकजा यांनी दसऱ्याला गडावर जरुर यावे. मात्र त्यांना येथे भाषण करता येणार नाही, एवढेच आमचे म्हणणे आहे. भगवानबाबांची ही गादी सर्वांनी जपावी. पंकजा यांना भाषण करावयाचेच असेल तर ते गडाच्या पायथ्याशी करावे. त्यांना आमचा पाठिंबा राहील. भाषणासाठी हट्ट करुन कुणीही आपल्या नेत्याला लहान करु नये. मराठा समाजाने काहीही न बोलता मूकमोर्चे काढत एकजूट दाखवली. त्यामुळे भाषणावरुन समाजात भांडणे नकोत, असे शास्त्री म्हणाले. ( प्रतिनिधी)