शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पैशासाठी विज्ञान अभ्यास नको

By admin | Updated: January 5, 2015 06:40 IST

धर्मातून नैतिकता येत असली तरी तिला विज्ञानाचा आधार पाहिजे आणि शुद्ध ज्ञान म्हणजे विज्ञान होय. म्हणून पैसे कमविण्यासाठी नाही

मुंबई : धर्मातून नैतिकता येत असली तरी तिला विज्ञानाचा आधार पाहिजे आणि शुद्ध ज्ञान म्हणजे विज्ञान होय. म्हणून पैसे कमविण्यासाठी नाही, तर ज्ञान प्राप्त करण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास करा, असे आवाहन नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी बालमित्रांना केले.मुंबईत आयोजित १०२व्या भारतीय विज्ञान परिषदेतील वांद्रे-कुर्ला संकुलातील बालविज्ञान मेळाव्यात कैलाश सत्यार्थी बोलत होते. ते म्हणाले, दिवा हा अंधकार दूर करतो. म्हणून आयुष्य दिव्यासारखे जगा, पुस्तकासारखे जगा़ कारण एक पुस्तक प्रकाशित होते तेव्हा एक दिवा प्रज्वलित होतो. आणि हिंसेला आयुष्यातून नेहमी दूर ठेवा; कारण जेव्हा बंदुकीची गोळी तयार होते तेव्हा एक जीव मरतो. आयुष्य समृद्ध करायचे असेल तर विज्ञानाची कास धरा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पूर्णविराम विसरून जा. प्रश्न विचारा आणि त्यांची उत्तरे शोधा. संशोधक बना़ धर्मवादी नाही, तर विज्ञानवादी बना. समाजाच्या भल्यासाठी आपल्या अंगभूत कौशल्यांचा वापर करा. देश, धर्म या जाचातून मुक्त होत वैश्विक बना, क्षमाशील बना. (प्रतिनिधी)