शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नका

By admin | Updated: November 19, 2014 04:52 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला काही कारणामुळे जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या स्मृतिदिनाला गेलो.

पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला काही कारणामुळे जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या स्मृतिदिनाला गेलो. उद्धव ठाकरे उपस्थित असल्याने त्यांची भेट झाली. त्याचा अजिबात राजकीय अर्थ काढू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व राज ठाकरे सोमवारी दादरच्या शिवाजी पार्क येथे एकत्र आले होते. त्यामुळे शिवसेना व मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राज यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत नव्या राजकीय समीकरणाविषयी नकार दिला. ते म्हणाले, माझी मुलगी उर्वशी आजारी असताना उद्धव हॉस्पिटलमध्ये आले होते. त्याही वेळी आमची भेट झाली. त्यानंतर स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर भेट झाली. अशा ठिकाणी आम्ही राजकीय चर्चा कशी काय करणार? कार्यकर्त्यांच्या भावना आणि भावांचा विषय वेगळा असतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली. सद्य:स्थितीत सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हे कळत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी विचित्र स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध होऊ शकत नाही. लोकांनी मतदान करून निवडून दिले. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी मतदान झाले पाहिजे. ‘आवाजी’च्या नावाखाली कार्पेटखाली कचराठेवून केवळ कार्पेट दाखविणे चुकीचे आहे. जाहीर मतदानातूनमतांचे विभाजन कळते. मात्र, गुप्त मतदानात घोडेबाजार होतो. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी उघड मतदान झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)