शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
2
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
3
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
4
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
5
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
6
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
7
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
8
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
9
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
10
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
11
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
12
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
13
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
14
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
15
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
16
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
17
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
18
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
19
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
20
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग

साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका - मुख्यमंत्री

By admin | Updated: April 5, 2015 20:13 IST

साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका, मगच मराठी साहित्याचा रथ अविरत पुढे जाऊ शकेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

ऑनलाइन लोकमत 
घुमान (पंजाब), दि. ५ -  जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या १५ भाषांमध्ये मराठीचा समावेश असून मराठी साहित्य संमेलनात जे विचार व संस्कृतीची झलक पाहायला मिळते ते इंग्रजी साहित्य संमेलनांमध्ये पाहायला मिळत नाही. अशा या साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका, मगच मराठी साहित्याचा रथ अविरत पुढे जाऊ शकेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
घुमान येथे सुरु असलेल्या साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुढील वर्षापासून दरवर्षी दस-यापूर्वी संमेलनासाठीचा निधी साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा असेल असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १५० हून अधिक प्रकारची साहित्य संमेलन होतात. आता राजकारण्यांचे साहित्य संमेलन होऊ नये व साहित्य संमेलनाचेही राजकारण होऊ नये.  नवीन उर्जा निर्माण करणा-या संत पंरपरेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम साहित्यिकांना करावे लागेल असे फडणवीस यांनी नमूद केले. पंजाब सरकारने मराठी साहित्य संमेलनासाठी सहकार्य केले यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंजाब सरकारचे आभार मानले. तसेच पुढील वर्षीचे पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात भरवावे अशी विनंतीही त्यांनी पंजाब सरकारला केली. साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी भाषेला आधुनिकतेशी जोडावे लागेल असेही त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्या भाषणाने साहित्य संमेलनाचे सूप वाजले. 
 
संमेलनात मंजूर झालेले ठराव 
> मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे आकाशवाणी व दुरदर्शनवर थेट प्रक्षेपण करा,
> घुमान मराठी साहित्य संमेलनातील महत्त्वाचे ठराव, घुमानचे नामकरण 'बाबा नामदेव घुमान नगरी' असे करण्याची मागणी, पंढरपूर ते घुमान नामदेव एक्सप्रेस सुरु करावी.
> घुमान येथील मराठी साहित्य संमेलनात कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधाचा ठराव मंजूर.